वाटेतच एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST2021-01-13T05:34:16+5:302021-01-13T05:34:16+5:30

महिलेचा छळ धुळे : मेडिकल दुकान टाकण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये आणावे या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना ...

One died on the way | वाटेतच एकाचा मृत्यू

वाटेतच एकाचा मृत्यू

महिलेचा छळ

धुळे : मेडिकल दुकान टाकण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये आणावे या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना मालेगाव येथे घडली. शिवीगाळ करीत हातबुुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तिच्याजवळील स्त्री धन काढून घेण्यात आले. हा प्रकार वारंवार सुरू असल्याने आणि सततच्या जाचाला कंटाळून भाग्यश्री विवेश मराठे या विवाहितेने शिरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

अपघातात महिला जखमी

धुळे : साक्री तालुक्यातील हट्टी फोफरे येथील बसस्टॉपवर एमएच- १४ बीटी- २०८५ क्रमांकाच्या बसने महिलेला धडक दिली. अपघाताची ही घटना ११ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. यात सुमनबाई कारभारी मासुळे (४२, रा. हट्टी फोफरे, ता. साक्री) या महिलेला दुखापत झाली. अपघाताची नोंद निजामपूर पोलीस ठाण्यात सायंकाळी पावणे सहा वाजता करण्यात आली.

Web Title: One died on the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.