पोल्ट्री फार्मचे पडदे फाडण्याच्या किरकोळ कारणावरुन एकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 22:19 IST2021-02-20T22:19:21+5:302021-02-20T22:19:29+5:30
मोहाडी पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा

पोल्ट्री फार्मचे पडदे फाडण्याच्या किरकोळ कारणावरुन एकाला मारहाण
धुळे : पोल्ट्री फार्मचे पडदे फाडण्याच्या कारणावरुन एकाला शिवीगाळ व मारहाण करुन जखमी केल्याची घटना धुळे तालुक्यातील वडजाई येथे शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
धुळे तालुक्यातील वडजाई येथील हिरालाल रामभाऊ देवरे (५६) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. संजय रामभाऊ देवरे यांचा मुलगा साई हा शेतात पोल्ट्री फार्मचे पडदे फाडत होता. हिरालाल देवरे यांनी साईला समजवावे असे संजय देवरे यांना सांगितले. त्याचा राग येवून संजय देवरे यांनी हिरालाल देवरे यांना शिवीगाळ करीत हातातील लाकडी दांडक्याने डोक्यावर, पाठीवर, हातावर तसेच पायावर मारुन जखमी केले. शिवाय मोबाईलही फोडून नुकसान केले. ठार मारण्याची धमकी दिली. यानुसार संजय देवरे या संशयिताविरुध्द भादंवि कलम ३२४, ४२७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.