दोन तळीरामांकडून एकाला मारहाण; शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील घटना

By अतुल जोशी | Updated: November 17, 2023 17:45 IST2023-11-17T17:44:56+5:302023-11-17T17:45:26+5:30

याप्रकरणी थाळनेर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला.

One beaten by two Talirams; Incident at Thalner in Shirpur Taluk | दोन तळीरामांकडून एकाला मारहाण; शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील घटना

दोन तळीरामांकडून एकाला मारहाण; शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील घटना

धुळे : शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील एका हॉटेलमध्ये मद्य प्राशन करण्यासाठी आलेल्या दोन तळीरामांना टेबल ठोकू नका, असे सांगितल्याचा राग आल्याने त्यांनी एकाला शिवीगाळ करत मारहाण केली. हॉटेलमधील सामानाचे नुकसान केले. याप्रकरणी थाळनेर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला.

अर्जुन भील (रा. आमोदे ता. शिरपूर) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हॉटेल समी गार्डन येथे मद्य प्राशन करण्याकरिता दोघे जण आले होते. ऑर्डर दिल्यानंतर दोघांकडून टेबल वाजविला जात होता. यामुळे टेबल वाजवू नका, असे अर्जुन भील यांनी त्यांना सांगितले, त्याचा राग आलेल्या दोघांनी अर्जुन यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एकाने त्याच्या हातातील कड्याने डोक्याला मारल्याने दुखापत झाली. एवढ्यावरच न थांबता हाॅटेलचा मालक विकास दगा माळी (रा. शिरपूर) यांना देखील शिवीगाळ करत हॉटेलमधील सामानाची नासधूस केली.

अर्जुन भील (रा. आमोदे ता. शिरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघांविरोधात भादंविचे कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस नाईक रामाेळे करीत आहेत.

Web Title: One beaten by two Talirams; Incident at Thalner in Shirpur Taluk