२५ हजारांच्या गुंगीकारक औषधांसह एकाला अटक
By देवेंद्र पाठक | Updated: June 10, 2024 17:13 IST2024-06-10T17:13:24+5:302024-06-10T17:13:37+5:30
धुळे बसस्थानकाशेजारी टॅक्सी स्टँड आहे. या ठिकाणी एक तरुण संशयितरीत्या फिरत असून, त्याच्याकडे औषधींचा साठा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली.

२५ हजारांच्या गुंगीकारक औषधांसह एकाला अटक
धुळे : शहरातील बसस्थानकाजवळ नंदुरबारच्या तरुणाला संशयावरून पकडण्यात आले. त्याची चौकशी आणि तपासणी केली असता त्याच्याकडे गुंगीकारक औषधींचा २४ हजार ९७५ रुपयांचा साठा हस्तगत करण्यात आला. ही कारवाई रविवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. अजय राजू कोठारी (वय ३३, रा. नंदुरबार), असे संशयित तरुणाचे नाव आहे.
धुळे बसस्थानकाशेजारी टॅक्सी स्टँड आहे. या ठिकाणी एक तरुण संशयितरीत्या फिरत असून, त्याच्याकडे औषधींचा साठा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. माहिती मिळताच सापळा लावून तरुणाला रविवारी सायंकाळी उशिरा पकडण्यात आले. त्याची चौकशी आणि तपासणी केली असता त्याच्याकडे गुंगीकारक औषधींचा २४ हजार ९७५ रुपयांचा बेकायदेशीर साठा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला असून, त्याच्या विरोधात शहर पाेलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास शहर पोलिस निरीक्षक धीरज महाजन करीत आहेत.