धुळ्याच्या एमआयडीसीतील चोरीचा उलगडा, एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 22:55 IST2021-02-01T22:55:01+5:302021-02-01T22:55:19+5:30
मोहाडी पोलिसांची कारवाई

धुळ्याच्या एमआयडीसीतील चोरीचा उलगडा, एकाला अटक
धुळे - मुंबई आग्रा महामार्गावरील अवधान एमआयडीसीत दोन ठिकाणी चोरी करणाऱ्या एकाला चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली. ही कारवाई मोहाडी पोलिसांनी केली.
९ जानेवारी रोजी अवधान एमआयडीसीतील अर्चना इंडस्ट्रीज कंपनीमध्ये गोडावूनचे कुलूप तोडून चोरट्याने टीव्ही, लॅपटॉप, सीसीटीव्ही फोडून नुकसान केले होते. तर येथून जवळच असलेल्या सुनील मोहनलाल अग्रवाल यांच्या मालकीच्या वर्धमान पेंट येथून १८ हजार रुपयांची चोरी केली होती. तसा गुन्हाही मोहाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांनी तपासाची चक्रे गतिमान करीत चोरट्यांचा शोध घेतला. चोरटे चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करण्याच्या उद्देशाने फिरत असताना मेहुणबारे पोलिसांना सापडले. त्यानंतर तेथून मुश्ताक सय्यद (पूर्ण नाव माहित नाही) या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याची विचारपूस केली असता तीन जणांसोबत चोरी केल्याची कबुली त्याने दिली. त्यांच्याकडून १८ हजारांपैकी १ हजार जप्त करण्यात आले आहे
ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु, कर्मचारी प्रभाकर ब्राम्हणे, श्याम काळे, गणेश भामरे, सचिन वाघ, जितेंद्र वाघ, कांतीलाल शिरसाठ, धिरज गवते यांनी कारवाई केली.