ऐचाळे शिवारातून दीड लाखांची वायर लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 22:29 IST2021-04-03T22:28:37+5:302021-04-03T22:29:18+5:30
निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ऐचाळे शिवारातून दीड लाखांची वायर लंपास
धुळे : साक्री तालुक्यातील ऐचाळे शिवारातून सुझलॉनची १ लाख ४२ हजार रुपये किंमतीची कॉपर केबल चोरट्याने लांबविली. ही घटना बुधवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
साक्री तालुक्यातील जैताणे येथील धनगरवाड्यात राहणारे लहू आसाराम बोरसे या सेक्युरिटी मॅनेजरने निजामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, सुझलॉन कंपनीची टॉवर के ३१८ येथील ३५० मीटर लांबीची ६३ हजार रुपये किंमतीची काॅपर केबल वायर आणि सुझलॉन कंपनीची टॉवर जे ९४ येथील ३६० मीटर लांबीची ७९ हजार २०० रुपये किंमतीची कॉपर केबल वायर असे एकूण १ लाख ४२ हजार २०० रुपये किंमतीची कॉपर केबल वायर चोरट्याने लंपास केली आहे. चोरीचा हा प्रकार बुधवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली. घटना लक्षात आल्यानंतर शोधा शोध केली पण चोरट्यांचा काही तपास लागला नाही. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस कर्मचारी एस. डी. ठाकरे करीत आहेत.