समाजमाध्यमातून आक्षेपार्ह मजकूर व्हायरल; देवपूर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2023 17:39 IST2023-05-18T17:39:05+5:302023-05-18T17:39:16+5:30
धार्मिक तेढ निर्माण होईल असा मजकुर लिहिलेला आढळून आला.

समाजमाध्यमातून आक्षेपार्ह मजकूर व्हायरल; देवपूर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा
राजेंद्र शर्मा/धुळे
धुळे : समाजमाध्यमावर दोन समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर प्रसिध्द केल्याप्रकरणी देवपूर पोलिसात दोन जणांवर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. धार्मिक तेढ निर्माण होईल असा मजकूर समाजमाध्यमातून व्हायरल होत असल्याचा प्रकार मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलिसांच्या निदर्शनास आला.
पोलिस कर्मचारी प्रकाश थोरात यांनी फिर्याद दाखल केली. त्यांच्या मोबाईलवर एक पोस्ट आली. त्यावर १९ ते २० वर्षाच्या तरुणाचा फोटो डीपीमध्ये दिसून येत होता. धार्मिक तेढ निर्माण होईल असा मजकुर लिहिलेला आढळून आला. यामुळे थोरात यांनी या मजकुराशी संबंधित असलेल्या संशयावरुन जाफर अली मुक्तार अली सैय्यद (वय २०, रा. रमाबाई आंबेडकर नगर, गल्ली नंबर ९, देवपूर, धुळे) याच्यासह आणखी एक जण अशा दोन जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच संशयित जाफरअली सैय्यद याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस निरीक्षक मोतीराम निकम घटनेचा तपास करीत आहेत.