पत्नीच्या वर्षश्राद्धनिमित्ताने ‘त्यांनी’ केला महिला शिक्षिकांचा पुरस्काराने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:39 IST2021-09-26T04:39:02+5:302021-09-26T04:39:02+5:30
शिक्षक रवींद्र ठाकूर यांचा आदर्श उपक्रम शिक्षक रवींद्र ठाकूर यांचा आदर्श उपक्रम शिंदखेडा-आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, आठवण तुझी येत राहील...ही ...

पत्नीच्या वर्षश्राद्धनिमित्ताने ‘त्यांनी’ केला महिला शिक्षिकांचा पुरस्काराने सन्मान
शिक्षक रवींद्र ठाकूर यांचा आदर्श उपक्रम
शिक्षक रवींद्र ठाकूर यांचा आदर्श उपक्रम
शिंदखेडा-आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, आठवण तुझी येत राहील...ही कविता सादर करून अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी हुंदका देत पत्नीच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून रवींद्र ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तालुक्यातील कर्तबगार महिला शिक्षिकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील होते.
रवींद्र ठाकूर हे वीरदेल येथे शिक्षक म्हणून सेवेत आहे. त्यांची पत्नी चिरणे कदाणे येथील यशवंत विद्यालयात शिक्षिका होत्या. गेल्यावर्षी त्यांचा अल्पशा आजाराने आकस्मात निधन झाले. त्यांचा आज प्रथम स्मृतिदिन वर्षश्राद्ध दिन होता. कोणतेही कर्मकांड न करता तालुक्यातील कर्तबगार महिला शिक्षिकांची निवड करून त्यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरवावे असे त्यांनी आणि कुटुंबीयांनी ठरविले. आणि आज तो कार्यक्रम घेण्यात आला. येथील बिजासनी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सुनील सैंदाणे, शिंदखेडा नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत बीडकर, पोलीस निरीक्षक सुनील भांबड, आशाताई रंधे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षिका वैशाली रवींद्र ठाकूर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या कतृर्त्वावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली. पती रवींद्र ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. पत्नीच्या आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. गळा दाटून येत होता. यावेळी उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. ठाकूर यांची आठवीत शिकणारी मुलगी नक्षत्रा हिनेही आपल्या आईच्या आठवणी सांगितल्या. मान्यवरांच्या हस्ते निवड केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. निवड समितीत प्रा. संदीप गिरासे आणि प्रा. परेश शाह आणि प्रा. संदीप गिरासे हे होते.
पुरस्कारप्राप्त महिला शिक्षिका - माणिक प्रकाश पाटील (नूतन माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय धमाने), मनीषा सुरेशचंद्र सरिया (मुलींचे हायस्कूल दोंडाईचा), छाया अरुण पाटील (कृषी माध्यमिक विद्यालय होळ), ताहेरा हकीम उद्दीन (साकी गुरुदत्त हायस्कूल वायपूर), भाग्यश्री चंद्रशेखर भावे (दादासाहेब रावल हायस्कूल मालपूर).