परिचारिका संघटनेचा संपाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:25 IST2021-06-18T04:25:38+5:302021-06-18T04:25:38+5:30
धुळे - येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका संघटनेने संपाचा इशारा दिला आहे. त्याबाबतचे निवेदन गुरुवारी अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे ...

परिचारिका संघटनेचा संपाचा इशारा
धुळे - येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका संघटनेने संपाचा इशारा दिला आहे. त्याबाबतचे निवेदन गुरुवारी अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे व अधिसेवीका अरुण भराडे यांना सादर करण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष अजित वसावे, पूनम पाटील, राहुल सोनवणे, शशिकांत सोनवणे, व्हिक्टोरिया पाथरे, हेमंत देवरे, अक्षय माळी, गणेश शेटे आदी उपस्थित होते.
परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र परिचारिका संघटनेच्या लातूर शाखेने राज्यव्यापी संपाची घोषणा केली आहे. त्या संपात सहभागी होण्याचा निर्णय येथील धुळे शाखेने घेतला आहे. परिचारिका संवर्गातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे परिचारिकांवर अतिरिक्त कामाचा ताण आहे. त्यामुळे तात्काळ १०० टक्के पदभरती करावी, तसेच पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करावी, केंद्राप्रमाणे भत्ता देण्यात यावा आदी मागण्या परिचारिका संघटनेने केल्या आहेत. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यव्यापी संपात सहभागी होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. २१ ते २२ जून या काळात सकाळी ८ ते १० यावेळेत निदर्शने करण्यात येणार आहेत. २३ ते २४ जून याकाळात दोन दिवसांचा संप करण्यात येईल तरीही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर २५ जूनपासून बेमुदत संप पुकारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.