शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अनलॉकनंतर बाधितांचा आकडा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 12:24 IST

जिल्ह्यात ८६३ कोरोना बाधित : अनलॉकनंतर दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात ३६० बाधित आढळले

ठळक मुद्देबरे होण्याचा दर ५० टक्केधुळे शहरात ३२ कंटेन्मेंट झोन मुक्त जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ८६३ वर पोहचली अजमेरा आयुर्वेदिक रुग्णालय येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर

चंद्रकांत सोनार ।लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अडीच महिन्याच्या लॉकडाऊननंतर महिन्याभरापासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे़ मात्र जून महिन्यातील दुसºया आठवड्यात धुळे व शिरपूर शहरात बाधितांची संख्या वाढत आहे़ दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ८६३ वर पोहचली आहे़कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य शासनाने अडीच महिने लॉकडाऊन घोषीत केला होतो़ याकाळात जिल्ह्यात बाधितांची संख्या नियंत्रणात होती़ मात्र जून महिन्यातील अनलॉकडाऊन पहिला टप्या सुरू झाल्यापासून नागरिकांनी आरोग्य विभागाच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत बिनधास्तपणे शहरात फिरत असल्याने कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात येवून मोठ्या प्रमाणात विषाणूची लागण होऊन जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे़ जिल्ह्यात शिरपूर व धुळे शहरात सर्वाधिक रूग्ण आढळून येत आहे़ त्यामुळे नागरिकांनी आतातरी सावध होऊन नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे़शंभराहून अधिक स्वॅबशिरपूर येथे ६ ते २० जून दरम्यान ६८ रुग्ण बाधित आढळून आले आहेत़ जनता कर्फ्यूच्याच काळात बाधितांची संख्या अधिक झपाट्याने वाढली़ म्हणजेच २१ ते २६ तारखेच्या दरम्यान दररोज शंभरावर रुग्णांचे स्वॅब घेतले जात असल्यामुळे १७२ बाधित रुग्ण आढळून आले.आतापर्यंत या तालुक्यात २९९ बाधितांची संख्या असून त्यापैकी २० मयत झाले आहेत़ उर्वरित ८५ बाधित रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत, तर अद्यापही काही रुग्ण उपचार घेत आहेत़ आतापर्यंत या उपजिल्हा रुग्णालयात ८७२ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. तर दोनशेच्यावर रुग्णांचा अहवाल येणे बाकी आहे़महापालिकेतर्फे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.या ठिकाणी बुधवारपासून कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे स्वॅब घेण्यासाठी सेंटर कार्यान्वित झाले. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पहिल्याच दिवशी ३२ जणांचे स्वॅब घेण्यात आले. कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यासाठी बिलाडी रोडवरील शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी आता कोरोना स्वॅब कलेक्शन सेंटर सुरू करण्यात आले.धुळे शहरात ३२ कंटेन्मेंट झोन मुक्तशहरातील विविध भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे शहरात १०७ कंटेन्मेंट झोन झाले होेते़ त्यापैकी ३२ कंटेन्मेंट झोन मुक्त करण्यात आले आहे. शहर अनलॉक झाल्यानंतर कोरोना बाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. ज्या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळतात त्या भागात कंटेन्मेंट झोन केले जात आहे. चौदा दिवसांसाठी कंटेन्मेंट करण्यात येतो. या कालावधीत त्या भागात पुन्हा रुग्ण आढळला नाही तर ते क्षेत्र कंटेन्मेंट मुक्त करण्यात येते. त्यानुसार शहरात आतापर्यंत १०७ कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहे.शिरपूरच्या ५२ वसाहतीत शिरकाव : शहरातील ५२ वसाहतींमध्ये कोरोनाने शिरकाव केलेला आहे़ तसेच ग्रामीण भागातील आमोदे, अर्थे, भाटपुरा, सावळदे, बोराडी, करवंद, खंबाळे, वाडी, भोरखेडा, थाळनेर, मांडळ, तºहार्डी, शिंगावे, खर्दे बु़, गुजर खर्दे, सुकवद असे १६ गावांमध्ये देखील बाधित मिळून आले आहेत़ शहरातील १८ तर ग्रामीण भागातील भाटपुरा व खंबाळे येथील २ असे २० जणांचा मृत्यू झाला आहे़ यातील ३ जणांचा जळगांव येथे तर एकाचा पुणे येथे मृत्यू झाला आहे़ सहा ठिकाणी आता चाचणीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना होत आहे़जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय, शिरपूर व दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालय, अजमेरा आयुर्वेदिक रुग्णालय येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर अशा ठिकाणी उपचार केले जात आहे़बरे होण्याचा दर ५० टक्केकोरोना बाधित रुग्णांची वाढत जाणाºया संख्येने डोकेदुखी वाढविली असताना बरे होणाºया रुग्णांमुळे थोडा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्के इतका आहे. आतापर्यंत ३६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील २४ दिवसात २८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १ ते २४ जूनपर्यंत आढळलेल्या रुग्णांपैकी ५० टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे