शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

आता अवाजवी दर आकारणाऱ्या खाजगी रुग्णालयावर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 12:06 IST

भरारी पथकाची नियुक्ती । जिल्हा प्रशासन व महापालिकेचे स्वतंत्र पथक नियुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोना बाधित रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारणाºया खाजगी रुग्णालये व रुग्णवाहिकांवर आता भरारी पथकांची करडी नजर असणार आहे. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करीत असलेले खाजगी रुग्णलये व रुग्णवाहिका अवाजवी रक्कम वसूल करीत आहेत. त्यासंदर्भात रुग्णांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेत राज्य शासनाने भरारी पथके नेमण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना केल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात दोन पथके नेमण्यात आली आहेत.खाजगी रुग्णालये कोरोनाच्या काळातही बाधित रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करत असल्याच्या अनेक घटना राज्यभर उघडकीस आल्या आहेत. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणारी रुग्णालये व रुग्णवाहिकेचे दरपत्रक शासनाने याआधीच निश्चित केले आहे.मात्र कोरोनाबाधित रुग्णांची लूट होत असल्याचे चित्र राज्यभर निर्माण झाले आहे. जारी केलेल्या दरपत्रकाची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ७ आॅगस्ट रोजी भरारी पथक नेमण्याचे आदेश जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात दोन पथकांची स्थापना करण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या भरारी पथकात जिल्ह्यातील प्रांताधिकाºयांचा समावेश करण्यात आला आहे. तर मनपा आयुक्तांनी मुख्य लेखापाल एन.एम.भामरे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची भरारी पथकात नेमणूक केली आहे.भरारी पथक हे अचानकपणे खाजगी रुग्णालयात भेट देऊन तपासणी करणार आहेत.