धुळे : शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रसिद्ध अशा करिअर ३७० या मासिकामध्ये धुळ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय यांना अअअ क्षेणीत मानांकन मिळाले आहे. करिअर ३६० हे मासिक दरवर्षी भारतातील नामांकित विधी महाविद्यालयाची यादी प्रसिद्ध केली जाते. या यादीमध्ये बहुदा पुणे व मुंबई विधी महाविद्यालयाचा समावेश असतो. या यादीमध्ये धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयाचा पहिल्यांदा समावेश होऊन मानांकन मिळाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय १९७५ पासून विधी क्षेत्रातील शिक्षण देण्याचे काम करीत आहे. ॲड. रावसाहेब निळे व उत्तमराव पाटील यांच्या प्रेरणेतून सुरू झाले आहे. महाविद्यालयाचे विद्यमान अध्यक्ष महेंद्र निळे यांच्या नेतृत्वात चांगली कामगिरी करत आहे. संस्थेचे सचिव शशिकांत पाटील यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयास मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:36 IST