लसीकरणापासून कोणी वंचित राहता कामा नये : रंधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:39 IST2021-04-28T04:39:02+5:302021-04-28T04:39:02+5:30
बोराडी ग्रामपरिषदेच्या कार्यालयात शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ या सुधारित आदेशानुसार अंमलबजावणीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सरपंच सुरेखा पावरा ...

लसीकरणापासून कोणी वंचित राहता कामा नये : रंधे
बोराडी ग्रामपरिषदेच्या कार्यालयात शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ या सुधारित आदेशानुसार अंमलबजावणीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सरपंच सुरेखा पावरा अध्यक्षस्थानी होत्या. बैठकीला जिल्हा परिषद सदस्य जताबाई पावरा, शिरपूर पंचायत समिती सदस्य सरिताबाई पावरा, ग्रामविकास अधिकारी डी.आर. पेंढारकर, शिक्षणविस्तार अधिकारी आर.के. गायकवाड, जे.पी. जोशी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा देशमुख, सामाजिक कार्यकर्ते रमण पावरा, विशाल पावरा, नितीन पाटील, मधुकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य डोंगरसिंग पावरा, पोलीसपाटील अनिल पावरा, राजू सूर्यवंशी, चंद्रकांत वाघ, कविता बडगुजर, सुष्मा वाल्हे, सरला पाटील, संदीप पवार, प्रतीश कोळी, शांताराम बिऱ्याडे, अंबादास सगरे, लक्ष्मण गोपाळ, उमेश पावरा, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक वाय.आर. पाटील, विजया पाटील, दिनेश श्रीराव तसेच आरोग्य, शिक्षण, आशा सेविकी, अंगणवाडी, विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
राहुल रंधे म्हणाले की, बोराडी गावात मागील आठ दिवसांतील संपर्कात आलेल्या लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यादी करून स्वॅब घेणे, गावात सलग २ ते ३ दिवस रुग्ण आल्यास स्वॅब कॅम्प घेणे, गावात स्वच्छता, कंटेन्मेंट झोन बोर्ड व आरोग्य सर्वेक्षण, गावात व्यवस्था, होम आयसोलेशनमधील पाॅझिटिव्ह रुग्ण बाहेर न फिरणे, गावात लग्नामध्ये गर्दी न होऊ देणे, मास्कचा वापर याबाबत ग्राम समितीने चोख जबाबदारी पार पाडावी, तसेच कोरोना महामारीत कर्तव्यावर कसूर करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.