शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

ना कोरोनाची भीती ना प्रशासनाचा धाक, रात्री साडेआठनंतरही दुकानांचे शटर खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:35 IST

रुग्णसंख्येने ओलांडला ३२ हजारांचा टप्पा धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार कमी-अधिक असला तरी रुग्णसंख्येने ३२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे, ...

रुग्णसंख्येने ओलांडला ३२ हजारांचा टप्पा

धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार कमी-अधिक असला तरी रुग्णसंख्येने ३२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे, तर ४९७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही वाढणारी संख्या रोखण्यासाठी प्रशासनाने काही कठोर असे निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे़

निर्बंध लावण्यास सुरुवात

सुरुवातीच्या काळात दुपारी ४ वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश होते. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार ही वेळ वाढविण्यात येऊन सायंकाळी ६ वाजेपर्यंतची करण्यात आली. नंतरच्या काळात यात १ तासाने वाढ करून सायंकाळी ७ वाजेनंतर सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने, स्टॉल बंदचे आदेश पारित करण्यात आले आहेत. आता नव्या निर्बंधांनुसार रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत दुकाने पूर्णपणे बंदचे आदेश देण्यात आले आहेत.

काही दुकाने उघडी, तर काही बंद

सर्व प्रकारचे व्यवहार बंद असताना मात्र कारवाईची कोणत्याही प्रकारचा मुलाहिजा न बाळगता दुकाने सुरू असल्याचे ‘लोकमत’ने शुक्रवारी केलेल्या ‘रिअ‍ॅलिटी चेक’मधून समोर आले. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दत्तमंदिर चौकासह परिसरात हॉटेल व काही दुकाने सुरू होती. ग्राहक ये-जा करीत होते़ नेहरू चौकात लगोलग तीन ते चार दुकाने खुली होती़ लाइटांचा झगमगाट सुरू होता, तसेच झाशी राणी पुतळा चौकात असलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील सुरू होते़ त्यानंतर आग्रा रोडवरील जवळपास सर्वच दुकाने बंद असताना मात्र राजकमल टॉकीज परिसरात दुकाने उघडी असल्याचे दिसताच गस्तीवर असणाऱ्या पोलीस गाडीने तिकडे आपली दिशा वळविली़ दुकान बंद करण्याची तंबी देताच पटापट दुकाने बंद झाली. तो पर्यंत दुकान सुरूच होती.

याठिकाणी होता शुकशुकाट

शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवार, प्रकाश टॉकीजचा चौक, फुलवाला चौक, कराचीवाला खुंट आणि बसस्थानकाचा परिसर. मात्र, या विविध ठिकाणी असलेली सर्व दुकाने बंद होती़ परिणामी केवळ रस्त्याने वावरणाऱ्यांशिवाय कोणीही दिसून आले नाही.