ओझोन दिनानिमित्त प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ निसर्गमित्र समिती : वृक्षारोपण करीत वृक्षसंवर्धन करण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:43 IST2021-09-17T04:43:12+5:302021-09-17T04:43:12+5:30
हरित महाराष्ट्र अभियान २०२१ अंतर्गत महाराणा प्रताप विद्यालय येथे वृक्षारोपण कार्यक्रम झाला. यावेळी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी ...

ओझोन दिनानिमित्त प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ निसर्गमित्र समिती : वृक्षारोपण करीत वृक्षसंवर्धन करण्याचा निर्धार
हरित महाराष्ट्र अभियान २०२१ अंतर्गत महाराणा प्रताप विद्यालय येथे वृक्षारोपण कार्यक्रम झाला. यावेळी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी जिल्हा संघटक राजेंद्र ढोडरे यांनी सर्व उपस्थितांना शपथ दिली. संपर्क प्रमुख वैभव पाटील, शहर संघटक मनोज देवरे यांनी वृक्ष संवर्धनासाठी संरक्षक पिंजरे उपलब्ध करून दिले. याप्रसंगी वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेऊन पुढील वर्षी सर्व वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात येईल, अशी माहिती निसर्गमित्र समिती व राणा प्रताप विद्यालयाचे हरित सेना शिक्षक नरेंद्र पाटील यांनी दिली.
यावेळी शाळेचे चेअरमन विजयसिंह रतनसिंह सूर्यवंशी यांच्या हस्ते व निसर्ग मित्र समितीचे राज्य महासचिव संतोष पाटील, महाराणा प्रताप पतपेढीचे चेअरमन प्रकाशसिंह नारायणसिंह जाधव, निसर्गमित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, राज्य संघटक, प्रा. डॉ. सतीश पाटील, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भंडारी, विद्यालयाचे शिक्षक-शिक्षिका, आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी निसर्ग मित्र समितीचे धुळे शहराध्यक्ष प्रा. एच. ए. पाटील, धुळे शहर सहसचिव शिवाजी बैसाणे, शहर संपर्कप्रमुख वैभव पाटील, संघटक ईश्वर बैसाणे, प्रसिद्धी प्रमुख हर्षल महाजन, मनोहर चौधरी, आदर्श शिक्षक किशोर अरगडे, आदींनी परिश्रम घेतले.