धुळ्यात चोरट्यांकडून  नऊ दुचाकी हस्तगत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:47 IST2018-10-31T22:40:07+5:302018-10-31T22:47:16+5:30

आझादनगर पोलिसांत गुन्हा 

Nine bike gains from Dhori | धुळ्यात चोरट्यांकडून  नऊ दुचाकी हस्तगत 

धुळ्यात चोरट्यांकडून  नऊ दुचाकी हस्तगत 

 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आझाद नगर पोलिसांना मिळालेला गुप्त माहितीनुसार सापळा रचून दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल नऊ दुचाकी हस्तगत केल्या. आझादनगर पोलिस ठाण्याचे पथकाने बुधवारी पारोळा रोड चौफुली येथे ही सापळा रचून ही कारवाई केली. 
त्यात गोकुळ शालीग्राम बैसाणे(वय २६) रा़ तिखी ता़जि़धुळे, ज्ञानेश्वर ताराचंद्र कांबळे (वय २१) रा़ उमर्दे ता़एरंडोल जि़जळगाव यांच्यासोबत असलेली एम़एच़१८ ए़ई़९ ३८३ क्रमांकाच्या मोटारसायकलबाबत विचारणा केली होती़ ती पारोळा येथून चोरल्याची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली़ 
जळगाव जिल्ह्यातही चोरी
चोरट्यांनी आणखी काही मोटारसायकलींची चोरी केल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे  पोलिसी खाक्या दाखवून विचारणा केली असता त्यांनी धुळ्यासह एरंडोल, पारोळा येथूनही मोटारसायकली चोरल्या असल्याची कबुली दिली़   असा एकूण ९ मोटारसायकलीची अंदाजे २ लाख ५० हजार रूपयांचा माल जप्त केला़ दोन्ही आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, एच़एऩउगले, दिपक पाटील, सुनिल पाथरवट, रमेश माळी, शोएब बेग, महेश मोरे, धनराज मालचे,आतीक शेख, संजय भाई यांच्या पथकाने केली़ 

Web Title: Nine bike gains from Dhori