निमगूळला भवानीमाता यात्रा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 11:55 IST2019-05-10T11:55:09+5:302019-05-10T11:55:42+5:30
तगतराव परंपरा कायम : भाविकांनी मोठ्या संख्येने घेतले दर्शन

dhule
निमगूळ : शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ येथे अक्षय तृतीयेच्या दुसºया दिवशी येथील भांड नदी पात्रातील ग्रामस्थांचे ग्रामदैवत भवानी मातेची चार दिवसापासून मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रोत्सवाचा अबालवृद्धांनी यात्रेचा आनंद घेतला.
भवानी मातेला आहेर
येथील भवानी मंदिरावर अनेक वर्षाच्या परंपरेनुसार स्व. भगवंतराव नारायण बागल यांच्या घरुन आहेर चढवण्याच्या प्रथेनुसार यंदाही दिक्षा बागल यांनी वाजतगाजत आहेर पाठवून भवानी मातेला सजवण्यात आले. यासाठी किशोर जिजाबराव बागल, प्रा.वसंतराव बागल, हितेंद्र हरी बागल आदींनी उपस्थिती दिली.
तगतराव फिरवण्याची मौज
दरवर्षाप्रमाणे तगतराव दोन दिवस आधीच रंगीबेरंगी पताकांनी सजवून गावातील मुख्य रस्त्यावरुन सर्व ग्रामदेवतांना नारळ फोडण्याची प्रथा असून यंदा विलास हिंमत बागल यांनी ३१०० रुपये भेट देऊन आपली बैलजोडी तगतरावला जुंपण्याचा मान मिळविला. जास्त बैलजोड्या उपस्थितींमुळे यावर्षी बोली वाढवण्यात शेतकरीराजा आपला आनंद घेत होते. आलेल्या तमासगीरांनी तगतराव बैठक करुन वाजतगाजत गावातील सर्व मंदिरांना भेट दिली.
लोकनाट्याचे आकर्षण
आजही लोकनाट्याचे यात्रेत आकर्षण असून गेल्या एक महिन्यापासून येथील सीताराम खंडू पाटील, जयवंतराव आंदराव बागल, नथ्थू चिंतामण बागल, साहेबराव श्रीपत बागल, राजेंद्र रोहिदास मराठे आदींनी लोकनाट्य आयोजनासाठी परिश्रम घेतले. यात्रेत पाळणे, कटलरी दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने थाटली होती. यात मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. यासाठी येथील मराठा व्यायाम शाळा व जयहिंद मित्र मंडळ व्यायाम शाळा मल्लांनी कुस्त्यांचे आयोजन केले होते. मंदिराच्या उन्नतीसाठी भाजपा कार्यकर्ते हितेंद्र हरी बागल व माजी उपसरपंच दीपक वसंतराव बागल यांच्या प्रयत्नातून खासदार निधीतून दहा लाख निधी देऊन यंदा मंदिराला नवीन बांधकाम होत आहे.