शिक्षक भारती संघटनेची नवीन कार्यकारिणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:38 IST2021-08-23T04:38:24+5:302021-08-23T04:38:24+5:30
बैठकीत संघटनेच्या महानगराध्यक्षपदी दीपक पाटील, तालुकाध्यक्षपदी किरण मासुळे, साक्री तालुकाध्यक्षपदी जयवंत पाटील, शिरपूर तालुकाध्यक्षपदी रावसाहेब चव्हाण, शिंदखेडा तालुकाध्यक्षपदी राजेंद्र ...

शिक्षक भारती संघटनेची नवीन कार्यकारिणी
बैठकीत संघटनेच्या महानगराध्यक्षपदी दीपक पाटील, तालुकाध्यक्षपदी किरण मासुळे, साक्री तालुकाध्यक्षपदी जयवंत पाटील, शिरपूर तालुकाध्यक्षपदी रावसाहेब चव्हाण, शिंदखेडा तालुकाध्यक्षपदी राजेंद्र पाटील, महिला आघाडीवर अपर्णा पाटील, वंदना हालोरे यांच्यासह ७५ पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव इरफान अन्सारी होते. संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके, राज्य संघटक अशफाक खाटीक, नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोंढे, प्राथमिक विभागाचे राज्य सरचिटणीस भरत शेलार, विनाअनुदानित संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष जयवंत भाबड, राष्ट्र सेवा दलाचे नितीन माने, नुरा शेख, संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲड. मिलिंद बोरसे, जळगाव जिल्हाध्यक्ष नारायण वाघ, नंदुरबार जिल्हाध्यक्ष राहुल पाटील, प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कंखरे, केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल धनगर, माजी जिल्हाध्यक्ष लालाजी नांद्रे, विनोद रोकडे, अमीन कुरेशी उपस्थित होते.