सातपुड्यातील आदिवासी क्षेत्रातील बोरपाणी येथे परंपरेनुसार झाले नेवपी (दितवाऱ्या) पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:24 IST2021-06-29T04:24:28+5:302021-06-29T04:24:28+5:30

यावेळेस गावातील प्रमुख देवी-देवता वाघ देव, बाप देव, निवसा कुवर, कावाराणा, गाजण गुटा, विजवा माळी, नागदेव, आदी देवी-देवतांचे पूजा ...

Nevpi (Ditvarya) pujan was performed as per tradition at Borpani in the tribal area of Satpuda | सातपुड्यातील आदिवासी क्षेत्रातील बोरपाणी येथे परंपरेनुसार झाले नेवपी (दितवाऱ्या) पूजन

सातपुड्यातील आदिवासी क्षेत्रातील बोरपाणी येथे परंपरेनुसार झाले नेवपी (दितवाऱ्या) पूजन

यावेळेस गावातील प्रमुख देवी-देवता वाघ देव, बाप देव, निवसा कुवर, कावाराणा, गाजण गुटा, विजवा माळी, नागदेव, आदी देवी-देवतांचे पूजा करून मक्कीचा गाठा रांधून विशेष मानता केली जाते. यावेळी पूजा विधी अंडा, नागदेव, हिरवा चारा, निवसा, कुवर, नारळ, शेंदूर आदी सर्व पूजा सामग्रीने पूजा केली जाते. विशेष म्हणजे या दिवशी वरहात देवाला (पावसाला) येण्याची विनंती करीत असतात. या दिवशी घरात जेवण न बनवता बाहेर चुुलीवर मक्कीचा गाठा बनवून स्वयंपाक करीत असतात. देवस्थानीही स्वयंपाक केला जातो. तेथे छोटे-छोटे लाडू बनवून खाऊन उरलेल्या कच्ची घाटाचे सागाच्या पानात छोट्या-छोट्या पुड्या बनवून प्रत्येक घराला देत असतात. ही पुडी घरात दरवाजावर बांधतात. या दिवसापासून छपरावर सागाच्या पान ठेवणे, हिरवा चारा गुरांना चारणे, शेणाने घर लिंपणे, आदीला सुरुवात केली जाते. या पूजा (सणा) नंतर आदिवासी संस्कृतीतील सण-उत्सवाला सुरुवात होते. हे पूजन (सण) हा वर्षातील पहिला पूजा (सण) मानला जातो.

या दिवशी गावचे प्रमुख पुजारा, गाव पाटील, गाव प्रमुख (डायला) गाव नागरिक आदींच्या उपस्थितीत ही पूजा विधी केली जाते. वरील माहिती आज दशरथ पावरा यांनी प्रमुख व्यक्तीशी संवाद साधून माहिती मिळवली असून फार प्राचीन काळापासून आदिवासी समाजातून निसर्गाचे आभार व्यक्त करीत असतात.

Web Title: Nevpi (Ditvarya) pujan was performed as per tradition at Borpani in the tribal area of Satpuda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.