अधिकाऱ्याने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा परिचारिकांनी काळ्या फिती लावून केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 21:58 IST2019-06-05T21:57:26+5:302019-06-05T21:58:31+5:30
जिल्हा परिषद : बदली प्रक्रियेंतर्गत समुपदेशनासाठी आल्या होत्या जिल्ह्यातील परिचारिका

dhule
धुळे : जिल्हा परिषदेत बदल्यांची प्रक्रिया सुरू असून, मंगळवारी कृषी व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र यावेळी परिचारिका संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना सीईओंनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ परिचारिकांनी काळ्याफिती लावून निषेध केला. परिचारिकांनी लावलेल्या काळ्या फितींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
गेल्या शनिवारपासून जिल्हा परिषदेतील संवर्ग तीन व चारच्या कर्मचाºयांची बदली प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी या प्रक्रियेचा शेवटचा टप्पा होता.
मंगळवारी कृषी, आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या बदल्यांसाठी समुपदेशन करण्यात आले. बदलीपात्र कर्मचारी सकाळपासूनच जिल्हा परिषदेच्या आवारात दाखल झाल्याने, याठिकाणी प्रचंड गर्दी झालेली होती. यात काही परिचारिका लहान बाळांना सोबत घेऊन आल्या होत्या.
दरम्यान निमगुळ येथे कार्यरत असलेल्या सहायक आरोग्य सेविका व परिचारिका संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुनंदा निकम यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. यांनी काही दिवसांपूर्वी अपमानास्पद वागणूक दिली. या प्रकाराचा निषेध म्हणून बदली प्रक्रियेसाठी आलेल्या जवळपास १०० परिचारिकांनी काळ्याफिती लावून अधिकाºयाच्या वर्तुवणुकीचा निषेध केला. घडलेल्या प्रकाराबद्दल सीईओंनी माफी मागावी अशी मागणी निकम यांनी यावेळी केली.