पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृतीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:44 IST2021-06-09T04:44:14+5:302021-06-09T04:44:14+5:30
जयहिंद शैक्षणिक संस्था संचालित झेड.बी. पाटील महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अंतर्गत गुणवत्ता निर्धारण समिती, विवेक वाहिनी व पर्यावरण ...

पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृतीची गरज
जयहिंद शैक्षणिक संस्था संचालित झेड.बी. पाटील महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अंतर्गत गुणवत्ता निर्धारण समिती, विवेक वाहिनी व पर्यावरण अभ्यास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने एम.एस. भोसले यांचे ‘पर्यावरण संवर्धन जनजागृती’याविषयावर आयोजित ऑनलाइन व्याख्यान ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य.डॉ.पी.एच. पवार होते.
भोसले पुढे म्हणाले की, वर्तमान स्थितीत वाढती लोकसंख्या, औद्योगिक विकास, प्लॅस्टिकचा अति वापर, मोठ्याप्रमाणावर होणारी वृक्षतोड व जंगलतोड यामुळे मोठ्याप्रमाणावर पर्यावरण प्रदूषण व पृथ्वीवरील तापमानात वाढ होत आहे. यामुळे बरेच सजिवांच्या सजाती नष्ट झाल्या असून अनेक परिसंस्थांमध्ये बिघाड झाल्यामुळे परिणामी सजीव सृष्टीचे अस्तित्व धोक्यात येत आहे. परिसरात होत असलेली वृक्षतोड तसेच अतिक्रमण याविषयी वनविभागास माहिती देणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
प्राचार्य डॉ.पी.एच.पवार म्हणाले की, वृक्षारोपण केवळ कार्यक्रम फोटो सेशनपुरते न करता मोठ्या रोपांची लागवड करून त्यांचे संवर्धन करणे जास्त गरजेचे आहे. पर्यावरण रक्षणाच्या संदर्भाने भावी पिढीने अतिशय जागरूक व सजग रहाणे गरजेचे आहे. प्रास्ताविक व सूत्रसंचालन विवेक वाहिनी संयोजक प्रा.डॉ.पी.एस. गिरासे यांनी तर आभार प्रा.पी.बी. गायकवाड यांनी मानले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.व्ही.एस. पवार, डॉ.डी.के. पाटील, डॉ.वर्षा पाटील, पर्यावरण अभ्यास समिती संयोजक डॉ.एस.एस. पाटील आदी उपस्थित होते.