संगणकीय भाषा साधने विकसित करण्यासाठी अभ्यासकांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:40 IST2021-08-28T04:40:02+5:302021-08-28T04:40:02+5:30
जयहिंद शैक्षणिक संस्था संचालित झेड. बी. पाटील महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष व संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ...

संगणकीय भाषा साधने विकसित करण्यासाठी अभ्यासकांची गरज
जयहिंद शैक्षणिक संस्था संचालित झेड. बी. पाटील महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष व संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत दिनानिमित्त आय.आय.टी. मुंबईत येथील वरिष्ठ भाषाशास्त्रज्ञ डॉ. नीलेश जोशी यांचे ‘संस्कृत भाषा अभ्यासकाला संगणकीय क्षेत्रातील नवीन संधी’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. एच. पवार होते. याप्रसंगी सातारा येथील डाॅ. एस. के. जाधव, उपप्राचार्य प्रा.व्ही.एस.पवार, डाॅ.डी.के.पाटील, डाॅ.वर्षा पाटील, प्रा.अनिता पाटील सहभागी झाले होते.
डॉ.जोशी पुढे म्हणाले की, जगाच्या पाठीवरील सर्वच भाषा संगणकावर अर्टिफिशल टॅलेंटच्या माध्यमातून विकसित होत आहेत. इंग्रजीच्या तुलनेत इतर भाषांचा संगणकात वापर कमी असण्याचे हे एक कारण आहे. भाषा ही परमेश्वराने मानवाला दिलेली विशेष देण आहे. स्वभाषा विकासासाठी प्रत्येकाने आपल्यापरिने योगदान दिले पाहिजे.
प्राचार्य डॉ.पी.एच. पवार म्हणाले की, संस्कृत भाषा भारतीय संस्कृतीचे वैभव आहे. संस्कृत भाषा रचनेचे संगणकीय ज्ञानाशी बरेच साधर्म्य असल्याचे जाणवते. संस्कृत ही भारतीय भाषांची जननी आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संस्कृत विभाग प्रमुख प्रा.गायकवाड पी.बी. यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्रा.एस.बी.मुळे यांनी केले. आभार शंकर वसावे या तृतीय वर्ष संस्कृतच्या विद्यार्थ्याने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कृत विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.