माणसाचा विकास हेच ध्येय बाळगण्याची गरज ‘कर्तृत्वाचा अथांग सागर : सु. रा. बोरसे’ या विशेषांकाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अमरिशभाई पटेल यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:39 IST2021-09-22T04:39:55+5:302021-09-22T04:39:55+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार अमरिशभाई म्हणाले की, तापी खोरे विकास मंडळाच्या निर्मितीत सु. रा. बोरसे यांचा मोठा वाटा ...

माणसाचा विकास हेच ध्येय बाळगण्याची गरज ‘कर्तृत्वाचा अथांग सागर : सु. रा. बोरसे’ या विशेषांकाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अमरिशभाई पटेल यांचे प्रतिपादन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार अमरिशभाई म्हणाले की, तापी खोरे विकास मंडळाच्या निर्मितीत सु. रा. बोरसे यांचा मोठा वाटा आहे. शिरपूर तालुक्यातील सर्व पुलांच्या निर्मितीचे श्रेय त्यांनाच जाते. शेतकऱ्यांची जमीन कशी भिजेल, एवढ्या एका विचारासाठी स्वत:ला झोकून देणारे बोरसे मी पाहिले आहे. त्यांनी त्यांचे मित्र व्ही. डी. पाटील यांच्यासोबत धुळे - नंदुरबार जिल्ह्यातील बहुतेक प्रकल्प पूर्ण केले. बॅरेज ही नवी संकल्पना अमलात आणण्याचे श्रेय देखील त्यांचेच आहे. त्यांनी जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी निधी मिळविण्यासाठीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती.
जळगावचे माजी खासदार व काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, जि. प. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, साक्रीच्या आमदार मंजुळा गावीत, महापौर प्रदीप कर्पे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, पद्माकर देशपांडे, कमलकांत वडेलकर, संजय पवार, औरंगाबादचे मुख्य अभियंता विजय घोगरे, माजी माहिती आयुक्त व सु. रा. बोरसे यांची निकटवर्तीय इंजिनिअर वसंतराव पाटील, जलसंपदा विभाग साताराचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार गव्हर्न्मेंट कॉन्ट्रॅक्टर डी. आर. पाटील यांनी केला. यावेळी राजू सोनवणे, सुमीत बोरसे, अमित बोरसे, संकेत बोरसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर व सय्यद वाहिद अली यांनी केले.