आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 22:28 IST2019-09-03T22:27:21+5:302019-09-03T22:28:01+5:30
मानवी जीवन व पर्यावरण यांचा परस्परांशी संबंध असून पर्यावरण व मानवी जीवन हे सर्वस्वी पर्यावरणावर अवलंबून आहे. मात्र आधुनिकीकरनाच्या ...

आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज
मानवी जीवन व पर्यावरण यांचा परस्परांशी संबंध असून पर्यावरण व मानवी जीवन हे सर्वस्वी पर्यावरणावर अवलंबून आहे. मात्र आधुनिकीकरनाच्या युगात पर्यावरणाची हाणी होत असून नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक जिवीत व वित्त हाणीच्या प्रसंगाना सामोरे जावे लागत आहे. गेल्या पाच वर्षात सातत्याने दुष्काळी परिस्थिती जिल्ह्यात होती या वर्षी चांगल्या प्रकारे पाऊस पडला आहे. पांझरा त्याच प्रमाणे कान, बुराई अश्या अनेक नद्या या वर्षी दुथडी भरून व्हायल्याने पुरा मुळे अनेक गावात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. धुळे शहरात देखील नदी काठच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरून मोठ्या प्रमावर नुकसान झाले आहे़ काही गावात घरांची पडझड, शेतीचे नुकसान तसेच गुरें व काही नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अनेक नैसर्गिक ,मानवनिर्मित, संकटना आपला देश, देशातील नागरिक व व सैनिक समर्थ पणे तोंड देत आले आहेत. आपत्ती ही सांगून येत नाही म्हणून आपत्ती नियोजीत नसते. मात्र आपत्तीचा आधार घेऊन आपत्ती निवारण्यासाठी खबरदारी म्हणून व्यवस्थापन नक्कीच करू शकतो. आपत्ती जन्य परिस्थितीत स्थानिक प्रशासन ज्यात बांधकाम आरोग्य, प्रशासकीय यंत्रणेसोबत महाविद्यालयीन विद्यार्थी, होमगार्ड पोलीस प्रशासन स्वयं सेविसंस्था सामाजिक कार्यकर्ते. यांचा सहकार्याने योग्य प्रशिक्षण देऊन आपत्ती वेळी लागणाºया उपयोगी साहित्याची पूर्तता करत. स्थानिक पातळीवर नागरिकांशी संवाद साधून मनोधैर्य वाढविणे महत्वाचे असते. आपत्ती पूर्व गृहपाठ अर्थात सतर्कता बाळगत निसगार्चा समतोल सांभाळणे देखील काळाची गरज आहे.आपत्ती वेळी सर्वांनी सामाजिक जबाबदारीने एकत्र उभे राहणे गरजेचे आहे
प्रा़. योगेश भदाणे, सं.शास्त्र विभाग, आऱडी़देवरे
महाविद्यालय,म्हसदी