राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 12:41 IST2020-01-08T12:40:58+5:302020-01-08T12:41:49+5:30

जिल्हा परिषद निवडणूक : उर्वरीत ठिकाणी मतमोजणी सुरु

NCP's district president defeated | राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पराभूत

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पराभूत

धुळे : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा म्हाडाचे माजी सभापती किरण शिंदे यांचा कुसुंबा गटातून पराभव झालेला आहे़ त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे उमेदवार संग्राम पाटील यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे़ धुळे तालुक्यातील कुसुंबा गटाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते़ चुरस वाढत असतानाच निकाल लागल्याने अनेकांना धक्का बसला आहे़ वाद्यवृंदाच्या तालात गुलालाची उधळण करण्यात आली़

Web Title: NCP's district president defeated

टॅग्स :Dhuleधुळे