धुळे महापालिकेत महासभेत राष्ट्रवादीचा राडा

By अतुल जोशी | Updated: December 19, 2023 17:01 IST2023-12-19T17:00:32+5:302023-12-19T17:01:45+5:30

सत्ताधाऱ्यांनी आंदोलकांना पांगविले.

NCP rally in Dhule Municipal Corporation | धुळे महापालिकेत महासभेत राष्ट्रवादीचा राडा

धुळे महापालिकेत महासभेत राष्ट्रवादीचा राडा

धुळे : वाढीव घरपट्टी रद्द करावी या मागणीसाठी आक्रमक होत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (अजित पवार गट) आज महापालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात राडा करण्यात आला. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. सुमारे १० मिनीटे हा गोंधळ सुरू होता. आंदोलन करणाऱ्यांना सभागृहातून बाहेर काढल्यानंतर महासभा सुरू झाली.

वाढीव घरपट्टी कमी करावी यासाठी सर्वच पक्षांतर्फे मागणी होत आहे. त्यातच आता महापालिकेतील विद्यमान सत्ताधाऱ्यांची मुदत अवघे काही दिवस शिल्लक आहे. त्यामुळे बुधवारी विविध निर्णय घेण्यासाठी महासभेचे आयोजन करण्यात आले होते.

महासभा सुरू होण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) कार्यकर्ते घोषणाबाजी देत सभागृहात घुसले. अचानक घोषणाबाजी सुरू झाल्याने सभागृहात गोंधळ उडाला. आंदोलनकर्ते महापौराच्या व्यासपीठापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र सत्ताधाऱ्यांनी या आंदोलकांना अडवून धरले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महापालिकेत बॅनरही फडकविले. अखेर या आंदोलकांना पांगविल्यानंतर महासभेला सुरूवात झाली. 

Web Title: NCP rally in Dhule Municipal Corporation

टॅग्स :Dhuleधुळे