साक्री तालुक्यातील पंचायत समिती गण निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:23 IST2021-06-30T04:23:25+5:302021-06-30T04:23:25+5:30
बैठकीस जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, सरचिटणीस सुरेश सोनवणे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, जि.प.विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे, साक्री तालुका ...

साक्री तालुक्यातील पंचायत समिती गण निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची बैठक
बैठकीस जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, सरचिटणीस सुरेश सोनवणे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, जि.प.विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे, साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जितेंद्र मराठे, पंचायत समिती साक्रीचे उपसभापती ॲड. नरेंद्र मराठे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरसाठ, भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनराज शिरसाट, राष्ट्रवादी कॉंग्रेस विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पिंपळनेरचे उपसरपंच विजय गांगुर्डे यांनी मार्गदर्शन केले.
तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवार उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष जितेंद्र मराठे, महिला तालुकाध्यक्ष रोहिणी कुवर, साक्री विधानसभा क्षेत्रप्रमुख विलास देसले, पिंपळनेरचे उपसरपंच विजय गांगुर्डे, अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष करीम शहा, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष भय्या साळवे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक संजीवनी गांगुर्डे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्पेश सोनवणे, राष्ट्रवादी सेवादल तालुकाध्यक्ष ॲड. सुनील नांद्रे, लीगल सेलचे तालुकाध्यक्ष ॲड.वाय.पी. कासार, किसान सेलचे तालुकाध्यक्ष सयाजी ठाकरे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष गितेश पाटील, साक्री शहराध्यक्ष मयूर आहिरराव यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.