शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

डिसेंबर महिन्यात धुळ्यात होणार राष्ट्रीय अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 10:48 PM

मराठा सेवा संघ : केंद्रीय कार्यकारिणी बैठकीचा समारोप, विविध विषयांवर झाली सविस्तर चर्चा

कापडणे : मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या धुळे येथील दोन दिवसीय बैठकीचा रविवारी समारोप झाला़ त्यात डिसेंबर महिन्याच्या शेवटी धुळ्यात मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले़ याशिवाय बैठकीत विविध विषयांवर देखील चर्चा झाली़ धुळे येथील सेवा संघाच्या मालोजीराव भोसले सभागृहात मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस शनिवारी धुळ्यात प्रारंभ झाला होता़ या दोन दिवसीय बैठकीचा समारोप रविवारी करण्यात आला़ या बैठकीस राज्यभरातून पदाधिकाºयांनी आपली उपस्थिती नोंदविली होती़  मराठा सेवा संघाच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घोगरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन महासचिव मधुकर मेहेकरे, कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे, कार्यालयीन सचिव सोमनाथ लडके, उपाध्यक्ष अरविंद गावंडे, नाशिक जिल्हाध्यक्ष दीपक भदाणे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्षा माधुरी भदाणे यांच्यासह सर्व विभागीय अध्यक्ष, सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्ह्याचे पदाधिकारी तसेच सेवा संघाच्या ३३ कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणी बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आली. यात जिल्हानिहाय सभासद नोंदणी आढावा घेणे, धुळे येथे होणाºया नियोजित अधिवेशनासंदर्भात नियोजन करणे, सिंदखेडराजा येथे होणाºया जिजाऊ जन्मोत्सव-२०२० चे नियोजन करणे, मराठा विश्वभूषण पुरस्काराकरीता नावे निश्चित करणे, केडर कॅम्प आयोजित करणे आदी विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली़ तसेच धुळ्यात डिसेंबर महिन्याच्या शेवटी शेवटी राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचे देखील ठरविण्यात आले़ या अधिवेशनात कशा प्रकारचे नियोजन असेल यावर देखील पदाधिकाºयांनी चर्चा केली़ या बैठकीसाठी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भदाणे, सचिव एस. एम. पाटील, कार्याध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष पी. एन. पाटील, सहसचिव सुनिल पवार, श्याम भदाणे, उद्योजक कक्षाचे अनंत पाटील, कोषाध्यक्ष प्रविण पाटील, प्रा. प्रेमचंद अहिरराव, प्रा. सदाशिव सुर्यवंशी, प्रशांत भदाणे, मिलन पाटील, तालुकाध्यक्ष भुषण पाटील, प्रविण पाटील, मनोज पाटील, रामकृष्ण पाटील, तालुका उपाध्यक्ष बी. एम. पाटील, प्रविण पाटील, सागर भदाणे, नितीन पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. सुलभा कुवर, विभागीय मार्गदर्शक डॉ़ उषा साळुंखे, विभागीय अध्यक्षा किरणताई नवले, जिल्हाध्यक्षा नूतन पाटील, सचिव वसुमती पाटील, जयश्री पाटील, मंगला सोनवणे आदी प्रयत्नशिल होते. विविध विषयावर चर्चा देखील करण्यात आली़ गुणवंतांचा झाला सन्मानकेंद्रीय कार्यकारिणी बैठकीचे औचित्यसाधून मराठा समाजातील गुणवंतांचा यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला़ त्यात अनंत पाटील, धुळे येथील परिवर्तन विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदीश पाटील (कापडणे ता़ धुळे), आऱ ओ़ पाटील (नरडाणा ता़ शिंदखेडा), बाळासाहेब भदाणे (बोरकुंड ता़ धुळे), अमोल पाटील यांचा समावेश होता़ 

टॅग्स :Dhuleधुळे