हर्बल औषधीवर राष्ट्रीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 14:28 IST2020-03-14T14:28:05+5:302020-03-14T14:28:27+5:30

पटेल फार्मसी महाविद्यालय : १७० विद्यार्थ्यांचा सहभाग, ९८ पोस्टर सादर

National Conference on Herbal Medicine | हर्बल औषधीवर राष्ट्रीय परिषद

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : येथील एच.आर.पटेल फार्मसी महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हर्बल मेडिसिन याविषयावर राष्ट्रीय परिषद नुकतीच संपन्न झाली. विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांनी परिसंवादात उस्फुर्तपणे सहभाग घेतला.
परिषदेचे उद्घाटन मुंबई येथील अविनाश देवधर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ.डी.आर. पाटील, प्राचार्य डॉ.एस.बी. बारी, प्राचार्य डॉ.एस.जे. सुराणा, नागपूर येथील डॉ. रेणुका दास, परिषदेचे संयोजक प्रा.चेतन भावसार, समन्वयक प्रा.राकेश मुथा आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.डी.आर. पाटील यांनी इंग्रज भारतात येण्याअगोदरची व नंतरची परिस्थिती यावर भाष्य करत आपण नैसर्गिक जैवविविधतेचे संवर्धन करून आपल्याकडे उपलब्ध हर्बल मेडिसिनचा वापर व विपणन करून देशाचा जी.डी.पी. वाढवला पाहिजे असे प्रतिपादन केले. डॉ.रेणुका दास यांनी हर्बल संशोधनचे व हर्बल औषधीचे अलीकडील ट्रेंड या विषयावर मार्गदर्शन केले.
पोस्टर सादरीकरण सर्धेत १७० विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवत ९८ पोस्टर सादर केले. सदर स्पर्धा वेगवेगळ्या पाच विषयात घेण्यात आली़ परीक्षक म्हणून डॉ.आर.एम. पाटील, डॉ.एम.जी. कळसकर, डॉ.एस.डी. फिरके, डॉ.एच.एम. पटेल, डॉ.एच.एस. महाजन, डॉ.आर.ओ. सोनवणे, प्रा.एम.बी. गगराणी, प्रा.यु.बी. महाजन, डॉ.जे.पी. महाशब्दे व डॉ.एस.पी. पाटील यांनी काम पहिले. पोस्टर सादरीकरण स्पर्धेत फार्माकोग्नोसी विषयात सुषमा गुजर व भावेश ढोले यांनी प्रथम, विशाल चौधरी व पूजा अमृतकर यांनी द्वितीय पारितोषिक मिळविले. फार्मासुटीकाल केमिस्ट्री विषयात अश्विनी मोरे व सागर पाटील यांनी प्रथम, काजल जैन व सागर कोठारी यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले. फार्मासुुटिक्स विषयात भाग्यश्री पाटील, रुपाली शिरसाठ, कल्पेश पाटील यांनी प्रथम तर अपूर्वा पाटील, गजानन धर्मे यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले. फार्माकोलोजी विषयात मीनाक्षी शर्मा यांनी प्रथम व जितेंद्र सोनवणे यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले. विज्ञान विषयात अविनाश टट्टू प्रथम तर प्रियांका कापडे व संपदा पाटील यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले.

Web Title: National Conference on Herbal Medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे