धुळे : नरडाणा येथील एका कंपनीत कार्यरत असलेला मयूर सिसोदे याची निर्घुण हत्या झाली होती़ याप्रकरणी पोलिसांचा केवळ तपास सुरु असून कोणालाही अटक अथवा पकडण्यात आलेले नाही़ या घटनेचा तातडीने तपास करावा, मारेकºयांना शोधून काढावे या प्रमुख मागणीसाठी नरडाणा ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत़ त्यांनी बंदची हाक दिली असून सकाळी पोलीस ठाणे गाठले आहे़ पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे़ मयूर सिसोदे खून प्रकरणी नरडाणा बाजारपेठ बंद करून ग्रामस्थांनी नरडाणा पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला़ यावेळी शिरपूरचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, नरडाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांच्याशी मोर्चेकºयांनी संवाद साधला़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्याशी चर्चा करण्याची मागणी मोर्चेकºयांनी केली असून नरडाणा पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन सुरू केले़ पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे़
मयूर सिसोदे खूनप्रकरणी नरडाणा ग्रामस्थ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 12:02 IST