आॅनलाइन लोकमतधुळे : मुलीचा विनयभंग करून तिच्या वडील व मामाला मारहाण केल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे ५ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी नरडाणा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.पिडीत मुलगी घराबाहेर वाळायला टाकलेले कपडे काढत असतांना संशयित आरोपी कपील राजेंद्र पाटील (२७, रा.नरडाणा) याने पिडीतेला तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगून त्याच्या घरी नेले. तिथे पीडीतेचा विनयभंग केला. घडलेल्या प्रकारामुळे मुलगी घाबरली. तिने घडलेला प्रकार वडील व मामाला सांगितला. ते दोघे जाब विचारण्यासाठी आरोपीच्या घरी गेले असता, आरोपीने त्या दोघांना मारहाण करून शिवीगाळ केली.याप्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नरडाणा पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी कपील पाटील यास अटक केली. तपास पोलीस उपनिरीक्षक बी.बी.हांडोरे करीत आहेत.
नरडाणा येथे मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 18:41 IST
संशयित आरोपीची पिडीत मुलीच्या वडील व मामाला मारहाण
नरडाणा येथे मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक
ठळक मुद्देकाम असल्याचे सांगून आरोपीने पिडीतेला घरी बोलावले होतेपिडीत घरी गेली असता केला विनयभंग आरोपीने पिडीतेच्या वडील, मामाला केली मारहाण