२८ विद्यार्थ्यांची वैद्यकीय संकेतक निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 12:20 IST2020-03-15T12:19:19+5:302020-03-15T12:20:05+5:30
शिरपूर । आर.सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : येथील आर.सी.पटेल फार्मसी महाविद्यालयात अंतिम वर्ष बी.फार्मसी व एम.फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी अॅडव्हॅन्टमेड मेडिकल कोडीग या कंपनीतर्फे मेडिकल कोडर (वैद्यकीय संकेतक) या पदासाठी कॅम्पस इंटरव्हू घेण्यात येवून त्यात २८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
कंपनीतर्फे हिरेन शाह, सुनील पटेल, पूर्वी शाह, नकुल जोशी, तुषार रंजन यांची टीम आली होती. हिरेन शाह यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रथम अॅडव्हॅन्टमेड बद्दल माहिती दिली. हि एक आरोग्य योजना आणि व्यवस्थापन केअर संस्था आहे. आज अनेक राष्ट्रीय आरोग्य योजना, ब्लूज संस्था, को-आॅप्स आणि एसीओ या संस्थेवर विसंबून आहेत.
वैद्यकीय संकेतक डॉक्टरांकडून वैद्यकीय अहवाल घेतात़ ज्यांमध्ये रोगीची स्थिती, डॉक्टरांचा निदान, डॉक्टरांच्या लिखित स्वरूपाचा संदेश यांचे जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय संकेतांमध्ये बदलून देण्याचे काम करतात. थोडक्यात मेडिकल कोडींग हे आरोग्य विमासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता व रोग्याची सविस्तर माहिती सांकेतिक भाषेत लिहून सादर करणे असून या कामाची परदेशात वाढती मागणी आहे. फार्मसी पदविका, पदवी, पदव्युत्तर अशा सर्वस्तरातील एकूण २३५ विद्यार्थ्यांनी मुलाखतीत भाग घेतला़ यात ११४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या नंतर टेक्निकल राऊंड व एच.आर. राऊंड पॅनलच्या प्रश्नांना उत्तरे देऊन यामध्ये २८ विद्यार्थ्यांनी आपली नोकरी पक्की केली. या सर्वांना १़८ ते २़५ लाख पर्यंत सॅलरी पॅकेज दिले जाणार आहे. मुलाखतीच्या आयोजनासाठी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट प्रमुख डॉ.एच.एस. महाजन, प्लेसमेंट अधिकारी शितल महाले, डॉ.कपिल अग्रवाल, डॉ.मोनिका ओला, डॉ.पंकज जैन, डॉ.सुचिता महाले, डॉ.विनोद उगले, प्रा.विलास जगताप, रजिस्टार जितेश जाधव यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, प्राचार्य संजय सुराणा, उपप्राचार्य अतुल शिरखेडकर यांनी कौतुक केले़