शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

सौंदर्याने नटलेल्या सातपुड्यातील नागेश्वर मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 1:12 PM

रौप्य महोत्सवाचे आचित्य साधून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : चोपडा मार्गावरील अजनाड बंगला फाट्यापासून २ किमी अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी श्रीक्षेत्र नागेश्वर मंदिर म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या हातून झालेले एक शिवकार्य़ हे शिवालय म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश येथीलही भाविकांचे श्रध्दास्थान आहे़ या परिसराचा कायापालट करतांना संस्थानचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या कल्पक व कुशाग्रबुध्दीने नैसर्गिक ठेवणीला कुठेही इजा न पोहचता, मंदिराचे पुरातनत्व कायम ठेवत गेल्या २५ वर्षात अत्यावश्यक खर्च करून हे नागेश्वर शिवालय व परिसराला वेगळी ओळख प्राप्त करून दिली आहे़ त्या विकासरूपी पुष्पमालेतीलच एक पुष्प म्हणजे गोमुख परिसरात आताच नव्याने बांधलेले श्री गणपती, पार्वतीमाता, श्री शंभू महादेवांचे मंदिर, गुरूदत्त, ऋषि महाराज, हनुमंत व मोतीमाता मंदिरे उभारली आहेत़१९९५ साली स्थापन झालेल्या संस्थानचे २०२० वर्ष रौप्य महोत्सवाचे आहे़ या दुग्धशर्करा योगाचे औचित्य साधून प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे़ प़पू़आनंद चैतन्य महाराजांचा त्रिदानात्मक सत्संग रात्रीच्या वेळी आहे़ प़पू़सखाराम महाराज अमळनेरकर यांचे शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण होईल़ या सोहळ्याला आनंदी, नाशिक, उज्जैन येथील विद्वान वैदीकांकडून महारूद्र स्वाहाकार आयोजित करण्यात आला आहे़ तालुक्याचे श्रध्दाळू व भाविक नेते भूपेशभाई पटेल यांचे प्रमुख नियोजनातून हा सोहळा होत आहे़ मंदिराची देखभाल आज स्वतंत्र नागेश्वर सेवा ट्रस्टच्यावतीने होत असली तरी कधी काळी हे मंदिर अनाथ होते़ श्री नागेश्वराचा परिसर दाट झाडांनी, वेली-वनस्पतींनी हिरवागार होता़ १० फुटजवळचे सहज दिसणे सुध्दा शक्य नव्हते़ त्याकाळात काही नागे साधू येथे वस्तीला होते़ या परिसरात असेच एक पेलाद महाराज म्हणून होवून गेले़ ते देखील विविध चमत्काराचे किस्से सांगत असत़ शिरपूर पॅटर्नची पाणी योजना जशी देशात नावारूपाला आहे तसे या तालुक्यात बालाजी मंदिर व नागेश्वर मंदिर या तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावलेल्या मंदिरांचा समावेश करता येईल़ माजी मंत्री अमरिशभाई पटेल, माजी खासदार स्वर्गीय मुकेशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांच्यामुळे मंदिरांचा जिर्णोद्वार होत आहे़ गोमुख मंदिरावर जाण्यासाठी असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्याबाजूस पुरातन गोमुख आहे़ गोमुखातून अनेक वर्षापासून अखंडपणे गोडपाण्याचा झरा वाहत आहे़ या गोमुखातून उन्हाळ्यात गार पाणी व हिवाळ्यात कोमटपाणी निघते़ दृष्काळातही या गोमुखातून वाहणारा हा झरा आटत नाही़ पाझरतलाव मंदिराच्या परिसरात असून १९७२ च्या दृष्काळात या पाझर तलावाचे काम केले आहे़ सालाबादाप्रमाणे श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी लाखोच्या संख्येने भक्तीभावाने भाविक दर्शन व नवस फेडण्यासाठी येत असतात़, अशी माहिती शिरपूरचे सुभाष कुलकर्णी यांनी दिली.

टॅग्स :Dhuleधुळे