महापालिकेने नाल्यावरील शेडचे काढले अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:39 IST2021-09-25T04:39:03+5:302021-09-25T04:39:03+5:30
शहरातून चार प्रमुख नाले वाहतात. या नाल्यावर आता वाहतुकीसाठी पूल बांधण्यात आले आहे. मुख्य वर्दळीच्या रस्त्याला छेदून हे नाले ...

महापालिकेने नाल्यावरील शेडचे काढले अतिक्रमण
शहरातून चार प्रमुख नाले वाहतात. या नाल्यावर आता वाहतुकीसाठी पूल बांधण्यात आले आहे. मुख्य वर्दळीच्या रस्त्याला छेदून हे नाले वाहत आहे. पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची महापालिकेतर्फे स्वच्छता करण्यात येते. मात्र, यानंतरही नाल्यातील पाणी तुंबण्याचे प्रकार होतात. कारण पाणी वाहण्यासाठी नाल्यातील अतिक्रमणामुळे जागा मिळत नाही. त्यात मुसळधार पाऊस झाल्यास तत्काळ नाल्यांना पूर येतो. नाल्यातच अतिक्रमण होत असल्याने नाल्यात पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन नाला काठावरील घरांत पाणी शिरण्याचे प्रकार होता. त्यामुळे महापालिका प्रशासन दरवर्षी नाल्यातील गाळ काढले. अतिक्रमणावर कारवाई करते. परंतु यानंतरही नाल्यावरील अतिक्रमणाचे प्रमाण अधिक आहे. नाल्याच्या काठावर व नाल्यामध्येच नागरिकांनी घरे बांधल्याने माेठी समस्या निर्माण होते. त्यानुसार महापालिका अतिक्रमण विरोधी पथकातर्फे बुधवारी वडजाई रोडवरील जनता सोसायटी, हाजीनगर येथील नाल्यावर पत्र्याचे शेड करून २५ बाय ३० आकाराचे शेड करून नाल्यातच अतिक्रमण करण्यात आले होते.