मनपा आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी
By Admin | Updated: January 11, 2017 00:09 IST2017-01-11T00:09:57+5:302017-01-11T00:09:57+5:30
आंबेडकर अध्ययन केंद्राच्या पदाधिका:यांनी मंगळवारी दुपारी आयुक्त संगीता धायगुडे यांच्याशी झालेल्या शाब्दिक चकमकीदरम्यान जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पत्र आयुक्तांनी पोलीस अधीक्षकांना दिले आह़े

मनपा आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी
धुळे : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्राच्या पदाधिका:यांनी मंगळवारी दुपारी आयुक्त संगीता धायगुडे यांच्याशी झालेल्या शाब्दिक चकमकीदरम्यान जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पत्र आयुक्तांनी पोलीस अधीक्षकांना दिले आह़े तसेच 24 तास पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आह़े
शहरातील मनपाच्या शेजारी असलेल्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्राच्या अतिक्रमणप्रकरणी मनपा प्रशासनाने पुन्हा नोटीस बजाविल्याप्रकरणावरून हा प्रकार घडला. आयुक्तांनी प्रथम अतिक्रमण काढून घ्या त्यानंतर पर्यायी जागेचा विचार केला जाईल, असे सांगितल्याने पदाधिकारी संतप्त झाले व शाब्दिक चकमक झाली़
धायगुडे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात, अध्ययन केंद्राचे अध्यक्ष एम़जी़ धिवरे कार्यकत्र्यासह आले आणि त्यांनी अतिक्रमण काढणा:या 50 लोकांना आम्ही मारून टाकू व त्यात आपला नंबर राहिल, असे पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार पाटील यांच्यासमोर धमकाविल्याचे नमूद आह़े
धिवरेंविरुद्ध गुन्हा
अभियंता कैलास शिंदे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार एम़जी़ धिवरे आणि 8 ते 10 कार्यकत्र्याविरुध्द भादंवि कलम 189, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
आज ‘काम बंद’
मनपा कर्मचारी समन्वय समितीने या घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी काम बंद आंदोलन पुकारले आहे.
हुकूमशाही पध्दतीची कारवाई खपवून न घेता प्रतिकार करू व त्यात आपला नाहक बळी जाईल, असे बोललो़ त्याचा आयुक्तांनी विपरीत अर्थ काढला़
-एम़ जी़ धिवरे