कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नगरपालिका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 22:45 IST2021-02-19T22:45:43+5:302021-02-19T22:45:53+5:30
दोंडाईचा : माजी आमदार जयकुमार रावल यांनी घेतली आढावा बैठक, मार्गदर्शक सूचना

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नगरपालिका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
दोंडाईचा - दोंडाईचासह महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुभाव लक्षात घेता आमदार जयकुमार रावल यांनी शुक्रवारी नगरपालिका, महसूल, पोलीस व दोंडाईचा शहरातील विविध सामाजिक सोशल क्लब यांची कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संयुक्त बैठक घेतली. त्यात मास्क न लावणे, सोशल डिस्टन्स न ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, कोव्हिडबाबत नियम न पाळणे आदींवर नगरपालिका व इतर सर्वच विभागांनी जनजागृती करण्याची गरज असून नागरिक ऐकत नसतील तर प्रसंगी दंड देखील आकारणे बाबत कारवाई करावी, अशा सूचना माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी दिल्या आहेत़
आमदार जयकुमार रावल यांचा बैठकीनंतर नगरपालिका प्रशासन अॅक्शनमोडमध्ये आले असून सुरवातीला जनजागृती व नंतर आवश्यकता भासल्यास कारवाई करण्याच्या पावित्र्यात दिसत आहे़
नगरपालिका सभागृहात आमदार जयकुमार रावल यांनी वाढत्या कोरोनाचा अटकाव करण्यासाठी व त्यावर उपाययोजना, तयारी बाबत आढावा बैठक बोलाविली होती. त्यात अपर तहसीलदार सुदाम महाजन, पालिका मुख्याधिकारी डॉ प्रवीण निकम, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ ललीतकुमार चन्द्रे, पालिका उपमुख्यआधिकरी हर्षल भामरे, भाजप शहराध्यक्ष प्रवीण महाजन, कृष्णा नगराळे, जितेंद्र गिरासे, पोलीस उपनिरीक्षक डॉ संतोष लोले, बांधकाम सभापती निखिल जाधव, नगरसेवक रवी उपाद्धे, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, हितेंद्र महाले, रोटरीचे रितेश कवाड, राजेश मुनोत, अंकुश अग्रवाल, लायन्सचे हमजाभाई कादियानी राकेश अग्रवाल, जगदीश पाटील, सुनील शिंदे, बांधकाम विभागाचे जगदीश पाटील, शिवनंदन राजपूत , शरद महाजन आदी उपस्थित होते.
आमदार जयकुमार रावल यांनी कोरोना वाढू नये म्हणून विभागवार नियोजनासह तयारीचा, उपाययोजनांचा आढावा घेतला. मागील काळात आतापावेतो ५ हजार ७२२ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून ३०२ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. १०२७ जणांना कोरोनाची लस दिल्याचे सांगण्यात आले. या वेळी आमदार जयकुमार रावल यांनी रुग्ण वाढल्यास काय तयारी आहे, या बाबत विचारणा केली. उपजिल्हा रुग्णालयातील आॅक्सिजन सिस्टीम तात्काळ अपडेट, दुरुस्त करण्याची सूचना दिली. उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यात कोरोना पार्श्वभूमीवर समन्वय असणे गरजेचे आहे. रेमिडिअर इंजेक्शन सह औषधी साठा तयार ठेवा, रोटरी, रोटरी सीनियर, लायन्स, जॉयंट्स आदिसह सोशल क्लब, जैन सोशल ग्रुप, व्यापारी असोसिएशन यांनी कोरोना निस्तरण्याबाबत उपाययोजना बाबत जनजागृती करावी. मास्क लावणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधकारक करावे, दोंडाईचा शहरात विविध १२ ठिकाणी मास्क न लावणे-सोशल डिस्टन्स न ठेवणे आदीवर संयुक्तपणे कारवाई करा. अत्याधुनिक कार्डिओ अंबुलन्स तात्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्यात. उपजिल्हा रुग्णालयातिल अस्वछता बघता नगरपालिका मार्फत ८ आठवडे स्वछता होणार असल्याचे देखील सांगितले. परंतु नागरिकांचा हलगर्जीपणामुळे कोरोना वाढला तर नाईलाजास्तव जनहीत बघता रविवार बंद ठेवावा लागेल व पुन्हा जास्तीचा उद्रेक झाला तर सवार्नुमते गुरुवार बंद ठेवावा लागेल. दरम्यान सर्वच विभाग काय उपाययोजना व कार्यवाही संदर्भात अधिकाऱ्यांनी माहिती दिली़