हद्दवाढीतील गावांमध्ये हातपंप दुरूस्तीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 11:11 IST2019-06-04T11:10:37+5:302019-06-04T11:11:09+5:30
महापालिका : आवश्यक ठिकाणी उपाययोजना

dhule
धुळे : महापालिकेत हद्दवाढीत समावेश करण्यात आलेल्या गावांमध्ये पाणीटंचाईच्या पार्श्वभुमीवर उपाय-योजना होण्यासाठी महापालिकेतर्फें हद्दवाढीतील ११ गावांमध्ये हातपंपाची दुरुस्त केली जात आहे.
शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी ठिकठिकाणी बसविण्यात आलेले ४५० पैकी ७० टक्के हातपंप बंद अवस्थेत पडले आहेत़ महापौर चंद्रकांत सोनार यांनी अधिकाºयांची बैठक घेऊन हद्दवाढ गावातील पाणीप्रश्न सोडविण्याच्या सुचना दिल्या आहेत़ त्यानुसार हद्दवाढ गावातील आवश्यक हातपंप तातडीने दुरूस्तीचे केली जात आहे़ अक्कलपाडा, डेडरगाव, नकाणे तलावातील शिल्लक जलसाठयातून पाणीपुरवठा केला जात आहे़ मात्र काही प्रभागात नागरिकांसाठी हातपंपही मनपाने बसविलेले आहे. त्यापैकी ७० टक्के हातपंप बंद पडले आहे़
नागरिकांना महापालिकेच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबुन राहावे लागते़ शहराची हद्दवाढ झालेल्या गावांमध्येही पाणीटंचाईची तीव्रता वाढली होती. त्यावर महापालिकेने स्थानिक स्तरावर उपाय करायला सुरूवात केली आहे. शहरात पाण्याचे स्त्रोत उपलब्ध करुन देण्यासाठी काही वर्षांपूर्वी शहरातील विविध ठिकाणी हातपंप बसविण्यता आले होते़. त्यामुळे तात्पुर्ता दिलासा मिळावा यासाठी हातपंपाची दुरूस्ती होत आहे़
गळतीमुळे पाण्याची नासाडी
पाणीपुरवठा करणाºया पाईप लाईनवर गेल्या महिन्याभरात वेगवेगळ्या ठिकाणी ९ मोठ्या गळत्या झाल्या. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे़ वारंवार होणाºया गळत्या थांबविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे़
वेळ निश्चित नसल्यान हाल
शहरातील विविध भागात पाणीपुरवठ्याचे दिवस, वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी त्या पाळल्याच जात नाही. पाणी सोडणाºया कर्मचाºयाला वाटले तेव्हा तो पाणी सोडतो. त्यामुळे मोठी त्रेधा उडून नागरिकांचे हाल होतात. विशेषत: महिलावर्गाला नेहमीच सतर्क राहावे लागते. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागातर्फे मात्र वेळेप्रमाणे पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा केला जातो़ त्यामुळे निश्चित दिवशी व वेळी पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.
टंचाईग्रस्त गावांना हातपंपाचा मिळेल दिलासा
नकाणे तलावात एक महिना पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांच्या नळांना तोटी नसेल त्यांनी सात दिवसांत नळांना तोटी बसवावी. अन्यथा कारवाई करण्यात आली दहा गावांचा महापालिकेत समावेश झाला. त्यातील गावांना उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यापार्श्वभूमीवर हातपंप दुुरुस्त करण्यात येत आहे.