महावितरण आपल्या दारी उपक्रमातून शेतकर्यांच्या अडचणी सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 22:49 IST2020-11-09T22:49:22+5:302020-11-09T22:49:22+5:30
शेतकऱ्यांना वीज जोडणीबाबत कार्यवाही करण्याच्यास सूचना आ. कुणाल पाटील यांनी दिल्या.

महावितरण आपल्या दारी उपक्रमातून शेतकर्यांच्या अडचणी सोडवा
href='https://www.lokmat.com/topics/dhule/'>धुळे : कृषी पंपासाठी वापरले जाणारे नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर त्वरित देऊन रब्बी हंगामात शेतकर्यांना अखंडित वीजपुरवठा द्यावा, मागणीनुसार तातडीने सिंगल फेज कनेक्शन सुरू करावे तर महावितरण आपल्या दारी अंतर्गत शेतकऱ्यांना वीज जोडणीबाबत कार्यवाही करण्याच्यास सूचना आ. कुणाल पाटील यांनी दिल्या.धुळे तालुक्यातील शेतीपंप व गावातील विजेच्या प्रश्नांसंदर्भात आमदार कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला कार्यकारी अभियंता डी. डी. भामरे, के.एस. बेले, माजी सभापती गुलाबराव कोतेकर, पं.स.माजी सभापती बाजीराव पाटील, उपकार्यकारी अभियंता एन.बी.गांगुर्डे, योगेश चव्हाण, हेमंत अहिरे, अशोक सुडके, योगेश पाटील, आबा शिंदे, सुभाष पाटील, दशरथ पाटील, भूषण बोरसे, विवेक जाधव आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सुरळीत व अखंडत वीज पुरवठा होण्यासाठी महावितरणकडून अडचणी सोडवाव्यात तसेच महावितरण आपल्या दारी योजना सुरू करून वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या अशा शेतकऱ्यांना वीज जोडणी करून द्यावी. तालुक्यात शेतशिवारात राहणाऱ्या अनेक ग्राहकांनी सिंगल फेज वीज पुरवठ्याची मागणी केली आहे. तसेच कृषीपंपाचा जळालेला ट्रान्सफॉर्मर उशिरा बसविण्यात येत असतो त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. कटआऊटसाठी आमदार निधीधुळे तालुक्यात ४८०० ट्रान्सफॉर्मरची संख्या आहे. या ट्रान्सफॉर्मरवर असलेले फ्यूज (कटआऊट) फुटलेले असून आणि धोकेदायक अवस्थेत आहेत. या सर्व ट्रान्सफॉर्मरवरील फ्यूज बदलून नवीन टाकण्यासाठी आवश्यक तो आमदार निधी देण्याचे आ. कुणाल पाटील यांनी यावेळी जाहीर केले. याबाबतचा त्वरित सर्व्हे करण्याच्याही सूचना आ.पाटील यांनी दिल्या आहेत. तसेच काही गावातील जीर्ण विद्युत तारा बदलण्याचे आदेश यावेळी दिले.