बोरीसच्या बौध्दविहार जागेसाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 15:24 IST2020-03-14T15:24:25+5:302020-03-14T15:24:47+5:30

बौध्दजन संग्राम समिती : मागण्यांसंदर्भात प्रशासनाला निवेदन सादर

Movement for the Buddhist site of Boris | बोरीसच्या बौध्दविहार जागेसाठी आंदोलन

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील बोरीस येथील बौध्द विहारच्या जागेच्या मागणीसाठी बौध्दजन संग्राम समितीने आक्रमक होत धुळ्यात शुक्रवारी धरणे आंदोलन केले़ यानंतर प्रशासनाला निवेदन सादर केले़
बोरीस येथील बौध्दविहारच्या मागणीसाठी मागासवर्गीयांच्या सांस्कृतिक कामासाठी तसेच विकास कामांसाठी बोरीस ग्रामपंचायत नाहरकत देत नाही़ त्यासाठी गट नंबर ७९२ गावठाण म्हसनवट ही जागा बौध्दविहारासाठी मिळावी़ म्हणून बोरीस गावातील बौध्दजन संग्राम समितीच्यावतीने धुळ्यातील क्युमाईन क्लबसमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी चंद्रवीर सावळे, नानाभाऊ बोरसे, दिलीप बोरसे, एऩ जी़ बोरसे, दिलीप बोरसे, मोहनसिंग गिरासे, अ‍ॅड़ विशाल साळवे, सुनील बोरसे सहभागी झाले होते़ यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले़

Web Title: Movement for the Buddhist site of Boris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे