मोटार वाहन निरीक्षकाला कॉलर पकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 22:03 IST2021-01-01T22:03:14+5:302021-01-01T22:03:32+5:30
हाडाखेड पोस्टनाका : दारू पिऊन केली पाच हजारांची मागणी

मोटार वाहन निरीक्षकाला कॉलर पकडून मारहाण
शिरपूर : दि. ३१ डिसेंबर असून दारू पिण्यासाठी पाच हजार रुपये देण्यास नकार देताच मोटार वाहन निरीक्षकाला कॉलर पकडून मारहाण केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील हाडाखेड तपासणीनाक्याच्या कार्यालयात शुक्रवारी पहाटे घडली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल झाला. त्याला अटक करण्यात आली आहे.
हाडाखेड गावचा सरपंच असून ३१ डिसेंबर असल्याने दारू पिण्यासाठी पाच हजार द्या, अन्यथा तुम्हाला गावात राहू देणार नाही, अशी धमकी देत ३१ डिसेंबर रोजी रात्री मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड तपासणीनाक्यावर सुरत अत्तरसिंग पावरा (रा. हाडाखेड ता. शिरपूर) हा आला. पण, त्याला परत पाठविण्यात आले. यानंतर पुन्हा तो १ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता आला आणि त्याने पाच हजारांची मागणी केली. त्याला पैसे देण्यास नकार देताच त्याने कॉलर पकडून मारहाण केली. यात शटार्चे बटण, नेमप्लेट पडून गहाळ झाली.
याप्रकरणी मोटर वाहन निरीक्षक महेश आनंदराव देशमुख यांनी सांगवी पोलीस ठाण्यात पहाटे साडेसहा वाजता फिर्याद दाखल केल्याने सुरज अत्तरसिंग पावरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्याला अटक करण्यात आली आहे.