बायको-पोरीला पाठवत नाही, म्हणून सासूला दगडाने मारहाण
By देवेंद्र पाठक | Updated: November 11, 2023 19:10 IST2023-11-11T19:10:13+5:302023-11-11T19:10:21+5:30
पत्नी व मुलीला सोबत पाठवीत नसल्याचा राग मनात धरून सासूला दगडाने मारहाण करण्यात आली.

बायको-पोरीला पाठवत नाही, म्हणून सासूला दगडाने मारहाण
धुळे :
पत्नी व मुलीला सोबत पाठवीत नसल्याचा राग मनात धरून सासूला दगडाने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी जावयासह दोघांवर पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आला.
गताबाई भरत भाेये (रा. पखरूण, पो. पानखेडा, ता. साक्री) या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास जावई देवीदास चौधरी (३०) आणि अन्य एक जण आले. त्यांनी पत्नी निकिता आणि मुलगी अशा दोघांना घरी घेऊन जाण्याचा आग्रह केला. यावर त्यांना नकार दर्शवीत गावातील दोन जणांना घेऊन येण्याचा सल्ला देण्यात आला. यावर त्यांनी नकार दर्शवीत मारहाण करण्यास सुरुवात केली. यात डोक्यासह तोंडाला आणि छातीला दुखापत झाली. मारहाणीत हाताबुक्क्यांसह दगडाचा वापर करण्यात आला. शिवीगाळ करत जिवे ठारमारण्याची धमकी देण्यात आली.
मारहाणीत जखमी झालेल्या गताबाई भोये यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिस हेड कॉन्स्टेबल पी. यू. सोनवणे घटनेचा तपास करीत आहेत.