शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

‘बबल्या इकस केसावर फुगे’ गाणे सर्वाधिक लोकप्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:32 PM

तब्बल पंधरा दिवसात सत्तर लाखांहून अधिक रसिकांचे ह्ज

चंद्रकांत सोनार ।

जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी गावातील खान्देशातील लोकप्रिय कलावंत सचिन कुमावत व त्यांच्या टीमने गेल्या महिन्यात तयार केलेल्या व मनी माय बबल्या इकस केसावर फुगे या गाण्याला तब्बल पंधरा दिवसात सत्तर लाखांहून अधिक रसिकांचे ह्ज मिळवित हे अहिराणी गाणे उत्तर महाराष्ट्रात लोकप्रिय झाले आहे़अहिराणी भाषेतुन स्थानिककलावंतांना संधीमराठी, हिंदी भाषेप्रमाणे खान्देशातील मायबोली अहिराणी भाषेला राज्यस्तरावर दर्जा मिळावा, यासाठी कुटुंबाकडून कलाक्षेत्राचा कोणताही वारसा किंवा पाठिंबा नसतांना देखील शेंदूर्णी गावातुन स्थानिक कलावंतांना घेऊन 'हाई साली प्यार करं ना', 'लगीन मा मचाडू धुम रं धुम', 'सावन ना महिना मा तुनी याद करनी', अशी सुमारे ५० पेक्षा अधिक गाण्याच्या माध्यमातुन अहिराणी भाषेचे स्थान टिकवुन ठेवण्यात यश आले आहे़ २८ मार्च रोजी 'बबल्या ईकस केसावर फुगे' या गाण्याला १५ दिवसात ७० लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत़ या गाण्यात गायक अण्णा सुरवाड़े यांनी काम पाहिले असुन कृष्णा जोशी,बालू वाघ, संजु सोनवणे, समाधान निकम,ऋषिकेश चौधरी, राहुल गुजर,राहुलबाबा चौधरी,अल्पेश कुमावत यांच्या सहकार्यातून साकारले आहे़अहिराणीला मराठी चित्रपटातस्थान मिळविण्याचा प्रयत्नअहिराणी भाषेवरील सावन ना महिना मा या आहिराणी गाणे आतापर्यत ४ कोटी लोकांनी युट्यूबच्या माध्यमातुन पाहिले आहे़ खान्देशातील साडेतीन जिल्ह्यातील भाषेतील अहिराणी भाषेवरील गाणे मराठी चॅनलव्दारे घरोघरी दिसावे, यासाठी मी प्रयत्न केले़ मात्र प्रतिसाद न मिळता अहिराणी भाषेवरील गीतांना मराठी चॅनल्सकडून नाकारण्यात आले़ माझी कलावंतांशी स्पर्धा नसून मायबोली भाषेला राज्यस्तरावर पोहचविण्यासाठी प्रयत्न आहेत़ या क्षेत्रात बी.कुमार, अशोक चौधरी, श्री बिरारी, संजय सोनवणे यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळाली तसेच भविष्यात मोठ्या पडद्यावर काम करण्याची इच्छा आहे़इंजिनियरींगचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर पुण्यात सात ते आठ हजारापर्यतची नोकरी केली असती़ मात्र कलावंत होऊन असंख्य रसिकांचे गळ्यातील ताईत झाल्याने मी समाधान आहे़ -सचिन कुमावतखान्देशच्या मातीचा वारसा यु ट्यूबचा माध्यमाने साता समुद्रापार नेणाऱ्या सचिन कुमावत यांनी अहिराणी बोली भाषेवरील एका पेक्षा एक दर्जदार गाणे सादर करून संपूर्ण खान्देशात एक नवीन ओळख निर्माण केली आहे़ त्यामुळे तरूणांपासून तर ज्येष्ठ नागरिकांनापर्यत सचिनच्या गाण्यानां पसंती मिळत आहे़वेगळे काही केल्याशिवाय कोणी ओळखत नाही़अहिराणी भाषेतील गीते लग्न समारंभात धूमधडाक्यात वाजविली जात आहेत. वेगळ्या धाटणीची मांडणी केल्यास किंवा वेगळे काही केल्यास लोक डोक्यावर घेतात, हे वास्तव आहे. तसाच प्रयत्न आपण केल्यामुळे आजवर अनेक अहिराणी गीते लोकप्रिय झाली असल्याचे खान्देशी कलावंत सचिन कुमावत ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले़

टॅग्स :Dhuleधुळे