मोकाट जनावरांचा मुख्य रस्त्यावर ठिय्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 22:21 IST2019-05-14T22:20:43+5:302019-05-14T22:21:31+5:30
महापालिका : पशुपालकांवर कारवाई करण्याची गरज ; रस्त्यावरील अपघाताच्या प्रमाणात वाढ

dhule
धुळे : शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे़ त्यामुळे वाहनचालकांच्या डोक्यावर कायम अपघाताची टांगती तलवार असते. रस्त्यांवर गुरे सोडून वाहतूक अडचण निर्माण करणाऱ्या मालकांविरुध्द कारवाई करण्याची गरज असतांना देखील महापालिका प्रशासन वेळकाढूपणा करीत आहे़
याठिकाणी असतो गुरांचा ठिय्या
पाच कंदील, कमलाबाई हायस्कूल चौक, सिग्नल चौक, महात्मा गांधी चौक अशा महत्त्वाच्या रस्त्यांवर व चौकात गुरे बिनदिक्कतपणे फिरतानाचे दृश्य कुठेही दृष्टीस पडते. त्यात गायींचे प्रमाण जास्त आहे. रस्त्यावर फिरतात. चौकात भाजीपाला विक्रेते असल्याने भाजी विक्रेते उरलेला भाजीपाला तेथे फेकत असल्याने येथे जनावरांची गर्दी होते. दत्तमंदिर चौक ते थेट बारापत्थर, शिवाजी महाराज चौकापर्यंत या मोकाट गुरांचा मुक्त संचार आढळून येतो.
मनपाकडे कोंडवाडाच नाही
मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात ठेवण्यात येते़ त्यानतंर गुरांच्या मालकावर कारवाई केली जाते़ मनपाकडे कोंडवाडा नसल्याने कारवाई भुमिका घेतली जात नाही़ त्यामुळे एका वर्षापासुन आरोग्य विभागाकडून कोणतेही कारवाई केलेली दिसुन येत नाही़
वाहतुक कोंडीचा मनस्ताप
मुख्य रस्त्याच्या मध्यभागी मोकाट ेजनावरे रस्त्यावर बसतात़ त्यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. काही रस्त्यावर अचानकपणे हे मोकाट जणावरे रस्ता ओलांडत असल्याने वाहनधारकांचे अपघात होत आहेत. रस्त्यावर वर्दळीचे प्रमाण मोठे असल्याने मुख्य चौकात सकाळ-संध्याकाळ वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार होतात. त्यातच ही जनावरे रस्त्यावर चालतात बºयाचदा रस्त्याच्या कडेला, चौकात बसून असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
मनपाचे पथक नावालाच
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी पथक नियुक्त केले जाते़ या पथकात मुकादम, स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असतो़ पथका कोणतीही कारवाई केली जात नाही़ केवळ रस्त्यावर बसलेल्या गुरांना उठवले जाते़
चारा विक्रेत्यांच्या त्रास
पाचकंदील चौक, पाटबाजार, दत्तमंदिर, पारोळा रोड, साक्रीरोड भागात आणि इतरही भागात जनावरे फिरताना दिसते. गेल्यावर्षी गुरांच्या मालकांना दंडही ठोठावण्यात आला. सकाळी मोकाट जनावरे चारा विक्रेत्यामागे फिरतात असतात त्यामुळे वाहतुकीचा त्रास सहन करावा लागतो़