माळीच गावात महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:42 IST2021-02-17T04:42:45+5:302021-02-17T04:42:45+5:30
शिंदखेडा तालुक्यातील माळीच येथील हेमराज झुंबरलाल करनकाळ हा सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास एका विवाहितेच्या घरात शिरला. त्यानंतर बेडरूममध्ये ...

माळीच गावात महिलेचा विनयभंग
शिंदखेडा तालुक्यातील माळीच येथील हेमराज झुंबरलाल करनकाळ हा सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास एका विवाहितेच्या घरात शिरला. त्यानंतर बेडरूममध्ये घुसून त्याने ३० वर्षीय विवाहितेचा विनयभंग केला. यावेळी त्या महिलेजवळ असलेल्या एका लहान बालकाला त्याने ढकलून दिले. महिलेने आरडाओरड केली असता परिसरातील लोक धावून आली व आरोपीला त्यांनी चोप दिला. पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेची माहिती मिळताच शिरपूर विभागाचे उपअधीक्षक अनिल माने, नरडाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे व पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली.
हेमराज करनकाळ हा संशयित दारूची नशा करतो. गेल्या काही दिवसांपासून त्याची दारू बंद असल्याने तो वेडसरपणे वागत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याला पोलीस ठाण्यात बाेलावून चौकशी केली असता तो काहीही बरळत असल्याने त्याला मनोविकार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. तथापि त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई नरडाणा पोलीस करणार आहेत.