मोहाडी पोलिसांनी पकडला गांजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 13:21 IST2018-10-30T13:20:16+5:302018-10-30T13:21:48+5:30
हेंद्रुण शिवार : कारवाई सुरु

मोहाडी पोलिसांनी पकडला गांजा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मोहाडी पोलिसांनी मंगळवारी सकाळी तालुक्यातील हेंद्रुण शिवारात कारवाई करत पोत्यात भरलेला गांजा पकडला आहे़ यासंदर्भात गुन्हा नोंदविण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरु होते़
धुळे तालुक्यातील हेंद्रुण मोघण शिवारात असलेल्या मंदिराच्या पायथ्याशी एका शेतकºयाकडून गांजाची शेती केली जात असल्याची गोपनीय माहिती मोहाडी पोलिसांना मिळाली़ माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पथकासह छापा टाकला़ यात गांजा हस्तगत करण्यात आला असल्याचे समोर येत आहे़ यासंदर्भात कायदेशीर कारवाई सुरु असल्याने नेमका किती रुपयांचा आणि किती वजनाचा गांजा जप्त करण्यात आला, कोणाला अटक केली आहे का, हे समजू शकलेले नाही़ मोहाडी पोलीस पुढील कारवाई करीत आहेत़