नेर येथे मोबाईल नेटवर्कची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:42 IST2021-08-20T04:42:05+5:302021-08-20T04:42:05+5:30
नेर हे मोठे बाजारपेठेचे गाव आहे. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सायबर, इतर व्यावसायिकांसह सध्या कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शाळा ऑनलाईन ...

नेर येथे मोबाईल नेटवर्कची समस्या
नेर हे मोठे बाजारपेठेचे गाव आहे. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सायबर, इतर व्यावसायिकांसह सध्या कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शाळा ऑनलाईन सुरू आहेत. तर काही कर्मचारी अजूनही वर्क फ्राॅम होम करीत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. या सर्वच बाबींसाठी नेटवर्क आवश्यक आहे. अनेकदा नेटवर्क मिळत नसल्याने लसीकरणासही वेळ लागतो. त्यामुळे नागरिकांचा संयम सुटून वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरच रोष व्यक्त केला जातो. परंतु नेटवर्कच नसल्याने तेही काम कसे करतील, असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच मुलांना ऑनलाईन अर्ज भरणे, विविध दाखले काढण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
कॉल ड्रॉपची डोकेदुखी
अनेकदा कॉल केल्यावर मध्येच तो ड्रॉप होतो. त्यामुळे एकमेकांविषयी गैरसमज निर्माण होत आहे. तसेच कॉल करूनही तो सुरू असतो. परंतु समोरच्या व्यक्तीला आवाजच येत नाही. घरात रेंज नसल्याने खासगी गोष्टीही बाहेर येऊन बोलाव्या लागत असल्याने नागरिकांमध्ये सर्वच मोबाईल कंपन्यांविषयी संताप व्यक्त होत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनीही पुढे येऊन ही समस्या सोडावी, अशी मागणी डाॅ. सुनील सोनवणे व ग्रामस्थांनी केली आहे.