मोबाईलने ‘मेमरी’ घालविली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST2021-07-07T04:44:47+5:302021-07-07T04:44:47+5:30
हे टाळण्यासाठी... मोबाईलमध्ये जरी नंबर सेव करण्याची पध्दत असली, तरी आपली स्मरणशक्ती जागृत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मोबाईलची बॅटरी ...

मोबाईलने ‘मेमरी’ घालविली!
हे टाळण्यासाठी...
मोबाईलमध्ये जरी नंबर सेव करण्याची पध्दत असली, तरी आपली स्मरणशक्ती जागृत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मोबाईलची बॅटरी संपल्यानंतर आपल्या परिवारातील सदस्यांचे किमान दहा नंबर तरी आपल्याला ताेंडपाठ असायला हवेत. मोबाईल क्रमांक पाठ करण्याची सवय केव्हाही महत्त्वाची ठरू शकते.
मुलांना, आजोबाला नंबर्स पाठ, कारण..
आजोबांना
महागडा मोबाईल विकत घेता आला नाही, मात्र काही नातेवाईकांकडे होता. त्यामुळे डायरीवर लिहून ठेवण्याची सवय लागली.
सखाराम पाटील, आजाेबा
आई
मूल शाळेत गेल्यावर काळजी असायची. शाळेतून येण्यास उशीर झाला, तर शाळेचा फोन नंबर भिंतीवर किंवा डायरीत लिहिलेला असायचा
- वंदना पाटील, आई
वडील
घरातील प्रत्येक सदस्य व नातेवाईकांचा नंबर डायरीत लिहिलेला असतो, तर काहींना तोंडपाठ केलेला आहे. त्यामुळे सहज लक्षात येतो.
धीरज पाटील, वडील