मुलं पळवल्याच्या संशयावरून धुळ्यात पाच जणांची ठेचून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 03:20 PM2018-07-01T15:20:39+5:302018-07-01T20:54:07+5:30

ग्रामस्थांच्या मारहाणीत दोन पोलीस जखमी

Mob kills five men suspected of kidnapping children in dhule | मुलं पळवल्याच्या संशयावरून धुळ्यात पाच जणांची ठेचून हत्या

मुलं पळवल्याच्या संशयावरून धुळ्यात पाच जणांची ठेचून हत्या

Next

धुळे: मुलं पळवल्याच्या संशयावरुन साक्री तालुक्यातील राईनपाड्यातील ग्रामस्थांनी पाचजणांची ठेचून हत्या केली आहे. हे पाचहीजण सोलापूरचे आहेत. आज दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र ग्रामस्थांनी पोलिसांनाही जबर मारहाण केली. यात दोन पोलीस जखमी झाले. 

सातारा आणि सांगलीतील सातजण राईनपाड्यात आले होते. बाजार असल्यानं मुलं पळवायला टोळी आल्याची अफवा यावेळी गावात पसरली. यानंतर ग्रामस्थांनी पाचजणांना ठेचून मारलं. भारत शंकर भोसले, दादाराव शंकर भोसले, भारत शंकर मालवे, अप्पा श्रीमंत भोसले आणि राजू भोसले अशी हत्या करण्यात आलेल्या पाचजणांची नावं आहेत. या पाचजणांची हत्या केल्यावर ग्रामस्थांनी त्यांचे मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयात टाकून दिले आणि पोलिसांनीदेखील मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छोरींग दोरजे साक्रीकडे रवाना झाले आहेत. पोलीस महानिरीक्षकांनी बंदोबस्तासाठी नंदुरबार, नाशिकसह अन्य जिल्ह्यातील फौजफाटा मागवला आहे. 

Web Title: Mob kills five men suspected of kidnapping children in dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app