मिस इंडिया विजेती गजनंदिनी गिरासे हिचा गौरव शिरपूर नगरीत गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 22:47 IST2021-02-19T22:47:49+5:302021-02-19T22:47:59+5:30
आमदार काशिराम पावरा यांनी केला सत्कार

मिस इंडिया विजेती गजनंदिनी गिरासे हिचा गौरव शिरपूर नगरीत गौरव
शिरपूर : खान्देशची मुलगी देशपातळीवर खान्देशचा नावलौकीक करते हे अभिमानास्पद आहे़ इच्छा शक्ती बळकट असल्यास त्यास माता-पित्यांनी साथ दिल्यामुळे मिस इंडिया गजनंदिनी सारखे मुली देखील यश मिळू शकतात़ तालुक्यातील मुले-मुली देखील चांगले शिक्षण घेवून प्रगती करीत आहेत़ पुढच्या भविष्यासठी अजून तिने तालुक्याचा नावलौकीक करावा अशी अपेक्षा आमदार काशिराम पावरा यांनी सत्कार कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करतांना केले़
१८ रोजी संध्याकाळी येथील दादुसिंग कॉलनीतील भाऊसाहेब इंद्रसिंग राजपूत मेमोरियल हॉलमध्ये मिस इंडिया विजेती गजनंदिनी उर्फ गौरी देवेंद्र गिरासे हिचा येथील राजपूत समाजाच्यावतीने सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला़ आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते तिचा विशेष गौरव करण्यात आला़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्केट कमिटीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया होते़ यावेळी माजी नगरसेवक नाटुसिंग गिरासे, जि़प़चे माजी उपाध्यक्ष काशिनाथ राऊळ, नितीन गिरासे, सेनेचे राजू टेलर आदी उपस्थित होते़