कृषी मंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:24 IST2021-07-11T04:24:40+5:302021-07-11T04:24:40+5:30
शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कृषी मंत्री दादा भूसे यांनी रिसोर्स बँक प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद ...

कृषी मंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कृषी मंत्री दादा भूसे यांनी रिसोर्स बँक प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकरी घेत असलेली पिके, त्यांना येणाऱ्या अडचणी मंत्री भूसे यांनी जाणून घेतल्या. आधुनिक पध्दतीने शेती करण्याचे आवाहन त्यांनी केले. शेताच्या बांधावर जाऊन त्यांनी पाहणी केली. सध्याच्या काळात पावसाने अजूनपर्यंत समाधानकारक हजेरी लावलेली नाही. परिणामी शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री भूसे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देतानाच सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही दिली. दुबार पेरणीचे संकट ओढवले तर शासनाने बी बियाणे मोफत द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी मंत्री भूसे यांच्याकडे केली.
या दौऱ्याच्या वेळी मंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी संजय यादव, कृषी विभागाचे अधिकारी आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हेमंत साळुंखे, धुळ्याचे महानगर प्रमुख मनोज मोरे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी महानगरप्रमुख प्रफुल्ल पाटील, संजय वाल्हे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.